Headlines

पाचगणी नगरपरिषदेच्या सत्तेचा कारभार हाती; नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी पदभार स्वीकारला.. शहर विकासाला प्राधान्य..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणूक निकालाला दोन दिवस होत असतानाच राष्ट्रवादी पुरस्कृत नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांनी आज नगरपरिषद कार्यालयात जाऊन अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. या वेळी राष्ट्रवादी प्रणित अपक्ष नगरसेवकांची लक्षणीय उपस्थिती होती. पदभार स्वीकारताना नगरसेवक शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, महेश खांडके, राजेश पारटे, अमित कांबळे, आकाश बगाडे,…

Read More

पाचगणी नगरपरिषद निकालाचा उद्या रविवारी फैसला; १९ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ईव्हीएम उघडणार, सत्ता कुणाची याकडे सर्वांचे लक्ष

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या २१ जागांच्या सार्वत्रिक निवडणुकीची उद्या रविवारी मतमोजणी होत असून १९ दिवस स्ट्रॉंगरूममध्ये बंदिस्त असलेली ईव्हीएम मशीन आज उघडली जाणार आहेत. या मतमोजणीतून ७५ उमेदवारांपैकी २० नगरसेवक तर ८ उमेदवारांमधून एक नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नगरपरिषदेचा हा ‘कठीण पेपर’ आज निकाली निघणार असल्याने संपूर्ण पाचगणीकरांचे लक्ष निकालाकडे लागले असून…

Read More

ज्येष्ठ नेत्या डॉ. शालिनीताई पाटील यांचे निधन; राजकारणातील बुलंद आवाज हरपला.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा कोरेगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात स्पष्टवक्तेपणा, निर्भीड भूमिका आणि संघर्षशील नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ नेत्या, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावदादा पाटील यांच्या धर्मपत्नी, माजी मंत्री, खासदार व आमदार डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांचे शनिवारी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी मुंबईतील माहीम येथील ज्योती सदन या निवासस्थानी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात…

Read More

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत कडक पोलीस बंदोबस्त; हॉटेल-लॉज-बंगल्यांना नोटिसा, अमली पदार्थांवर करडी नजर.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नवीन वर्ष २०२६ अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले असताना संपूर्ण सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. जावळी तालुक्यातील सावरी येथे मुंबई क्राईम ब्रँचने तब्बल ११५ कोटी रुपयांच्या ड्रग फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर काही दिवसांतच पाचगणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या संयुक्त कारवाईत मुंबईस्थित १० आरोपींना ताब्यात…

Read More

पाचगणीत अंमली पदार्थविरोधी पोलिसांची मोठी कारवाई; १० आरोपी ताब्यात, ५ लाखांचे कोकेनसदृश अंमली पदार्थासह ४२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाचगणी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत मुंबई येथील पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्यांचे साथीदार अशा एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे ५,००,००० रुपये किमतीचे कोकेनसदृश अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट असा मिळून एकूण ४२,८५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात…

Read More

पाचगणीमध्ये ब्रम्हाकुमारीज नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ ; ६ दिवसाच्या अभियानात २५ ठिकाणी कार्यक्रमाद्वारे जनजागृती…!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी ब्रम्हाकुमारीज संस्थेच्या वतीने नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ प्रसंगी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करीत नशामुक्ती अभियानांतर्गत १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला गेला..! पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या नाशमुक्ती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला…

Read More

महाबळेश्वरचे माजी सभापती मारुती सोनटक्के भारत भूषण अवॉर्डने सन्मानित.. दिल्ली दरबारी : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन ह्युमन राईट अँड अँटीकरप्शन ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे वतीने विविध क्षेत्रात केलेल्या मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याच्या गौरवार्थ पाचगणी येथील महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती व गुरुकृपा कॉन्व्हेंटचे संस्थापक श्री मारुती दत्तू सोनटक्के यांचा मा. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व राज्यमंत्री मुलीधर मोहळ यांच्या…

Read More

जावळीच्या मातीपासून महाराष्ट्रभर सुवास; सॅनफ्लोरिशची झेप नव्या वर्षात”  “कुटुंबवत्सल उद्योजकतेचा आदर्श; अरुण भिंताडेंचा ‘मिशन ३६’ संकल्प”

“अगरबत्ती, कोल्ड प्रेस ऑईल व अंडी व्यवसायातून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत विस्ताराचे “लक्ष” गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी (रोहन भोसले ) : कुटुंब वत्सल सामाजिक दातृत्वाची नाळ जोपासत आपण समाजाच काहीतरी देणं लागतो या भावनेने प्रेरित होऊन परदेशात राहून गावाच्या भूमिशी असलेली ओढ स्वस्त बसू देत नाही. आपल्या लोकांना रोजगार प्राप्त व्हावा. म्हणून आपल्याच गावात संजीवनी ऍग्रो…

Read More

अवैध दारु धंद्याला कंटाळलेल्या संतप्त महिला व युवकांचा चाप.; हुमगाव येथील दारूचे बॉक्स फोडून दिले पेटवून.. 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  जावळी तालुक्यातील हुमगाव गेल्या पंधरा दिवसांपासून पाचवड पाचगणी मार्गावर मुख्य चौकातच एकाने बेकायदेशीर दारुचा अड्डा सुरु केला होता.ग्रामस्थानी त्याला वारंवार समज देऊनही त्याने राजरोस पणे हा धंदा सुरूच ठेवला होता.अखेर या धंद्याला कंटाळून गावातील महिला व युवकांनी एकत्र येत सर्वच अड्डय़ावर धाड टाकून त्याचे दारूचे बॉक्स फोडून दिले पेटवून. त्यामुळे…

Read More

जावळीच्या सावरीमध्ये सापडला कोट्यावधीचा ड्रग्ज साठा.;  राजकीय वर्तुळात खळबळ…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा मेढा : जावळीतल्या सावळीत एमडी ड्रग्स फॅक्टरीचा पर्दाफाश सावळी गावात मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावळी (सावरी) गावात मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा टाकण्यात आला आहे.  एका शेडमध्ये एमडी ड्रग्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजन करून छापा टाकला असता या…

Read More
error: Content is protected !!