प्रतिपंढरपूर करहर आषाढी एकादशी आढावा बैठकीत मंत्री शिवेंद्रराजेंच्या सर्व विभागांना मार्गदर्शक सूचना; भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, चार अतिरिक्त एसटी बसची सुविधा
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या करहर येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सोयीसुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांची…

