Shristi

हातगेघर सोसायटी ठरावावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप; श्रीहरी गोळेंकडून मानकुमरे यांच्या आरोपांचे खंडन

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : हातगेघर विकास सेवा सोसायटीच्या रद्द झालेल्या ठरावावरून जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी केलेल्या आरोपांचे माजी भाजपा जावळी अध्यक्ष श्रीहरी तुकाराम गोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खंडन केले आहे. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात कोणतेही भांडण, धरपकड अथवा फरफट झाल्याचा प्रकार घडला नसल्याचा दावा गोळे यांनी केला…

Read More

प्रतिपंढरपूर करहर आषाढी एकादशी आढावा बैठकीत मंत्री शिवेंद्रराजेंच्या सर्व विभागांना मार्गदर्शक सूचना;  भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, चार अतिरिक्त एसटी बसची सुविधा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या करहर येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भाविकांच्या सोयीसुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांची…

Read More

पाचगणी बसस्थानकातील बेकायदेशीर पार्किंगवर सातारा विभागीय कार्यालय व पाचगणी पोलीस याची संयुक्त धडक कारवाई; बेकायदेशीर वाहनधारकांचे धाबे दणाणले..

पाचगणी बसस्थानक परिसरातील बेकायदेशीर पार्किंगवर संयुक्त कारवाई करताना एसटी प्रशासन व पाचगणी पोलिस स्टेशनचे अधिकारी. गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी बसस्थानक परिसरात २०० मीटरच्या हद्दीत बेकायदेशीररित्या पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांवर सातारा विभागीय एसटी कार्यालय आणि पाचगणी पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यभर…

Read More

हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलारच्या 1999 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा भिलार : : हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार येथील सन १९९९ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल सत्तावीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे, विद्यालयाचे माजी…

Read More

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती पाचगणीत उत्साहात साजरी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरातील शाहूनगर येथील अहिल्याबाई होळकर चौकात लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित धनगर समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देत समाजहितासाठी अहिल्यादेवींच्या कार्याचा…

Read More

पाचगणीत भेकराच्या पिल्लाची नागरी वस्तीत धाव; प्राचार्य कक्षात घेतला आश्रय कुत्र्यांच्या पाठलागाने घाबरलेले पिल्लू अखेर रेस्क्यू टीमकडून वनविभागाच्या ताब्यात

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरात सोमवारी दुपारी एक अनोखी आणि तितकीच हृदयस्पर्शी घटना घडली. जंगलातून भरकटून आलेले हरीण कुळातील ‘भेकर’ या वन्यप्राण्याचे पिल्लू नागरी वस्तीत शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने जीवाच्या भीतीने सैरभैर झालेल्या या भेकराच्या पिल्लाने अखेर श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेजमध्ये धाव घेत थेट प्राचार्य कक्षात आश्रय घेतला. प्राचार्यांच्या…

Read More

गार्डन पंपहाऊस येथील पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर; पाचगणीत उद्या शनिवारी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी यांच्या मार्फत शहर व परिसरात करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाणी पुरवठा कार्यालय परिसरातील गार्डन पंपहाऊस येथे ३०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनवरील गळती काढण्याचे तसेच नवीन पाईपलाईन जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सदर काम रात्री उशिरापर्यंत अथवा…

Read More

दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीचा पाचगणी-महाबळेश्वरात वावर.?; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन  

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीचा शोध सुरू असून, सदर आरोपी पाचगणी-महाबळेश्वर परिसरात वास्तव्य करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, हॉटेल व्यावसायिक तसेच पर्यटनस्थळी काम करणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्धापुर पोलीस स्टेशन, उपविभाग नांदेड ग्रामीण…

Read More

पाचगणीत शिवजयंतीच्या निमित्ताने जय्यत तयारी.. विविध कार्यक्रमांची होणार रेलचेल

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पाचगणी शहरात यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सर्वत्र भगवा साज चढला आहे. तर  शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण शिवभक्तांच्या बाईकला भगव्या झेंड्याची शिवमय झालर सजली आहे. शिवजयंती उत्सव समिती, पाचगणी व पाचगणी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १९ फेब्रुवारी २०२६ रोजी हा सोहळा…

Read More

पाचगणीत गुन्हेगारावर कडक कारवाई; भरत मालुसरेला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे (रा. गोडवली, पो. खिंगर, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) याच्यावर कठोर कारवाई करत त्याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाचगणी पोलिसांचा हा महत्त्वाचा निर्णय…

Read More
error: Content is protected !!