वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत पाणीटंचाई : नगरसेवक प्रसाद कारंजकर यांची निवेदनाद्वारे टंचाई टाळण्यासाठी नगरपरिषदेस आर्तहाक
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाचगणी नगरपरिषद हद्दीतील जिवंत विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून त्यातील गाळ काढून पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशा आशयाचे निवेदन नगरसेवक प्रसाद कारंजकर त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील तसेच नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांना देऊन निवेदनाद्वारे पाणी टंचाईवर उपाययोजनांची आर्तहाक दिली आहे…

