Headlines

सत्ताबदलानंतर नवा राजकीय डाव : लक्ष्मी कराडकर यांचा चार नगरसेवकांसह भाजप प्रवेश

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणीच्या राजकारणात आज एक महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम घडवणारी घटना घडली असून, सलग १५ वर्षे नगरपालिकेवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पाचगणीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सातारा येथे सुरू असलेल्या…

Read More

पाचगणीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे १५ व्या व्याख्यानमालेचे नियोजन पूर्ण; १५ ते १७ जानेवारीदरम्यान आयोजन

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मीनलबेन मेहता महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे यंदा १५वे वर्ष असून या व्याख्यानमालेच्या नियोजनासाठीची महत्त्वपूर्ण बैठक आज मीनलबेन विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत येत्या १५ जानेवारी ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या…

Read More

उत्कर्ष पतसंस्था पाचगणी शाखेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई शाखा पाचगणीचा तिसरा वर्धापन दिन आज पाचगणी येथील शाखा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिसरातील अनेक मान्यवर, सभासद व नागरिकांनी शाखेला सदिच्छा भेटी देत शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी बोलताना नगरसेवक अंकुश मालुसरे यांनी सांगितले की, उत्कर्ष पतसंस्था ही सभासदांचे हित जपणारी…

Read More

अल्पवयीन मुलीचे अपहरणप्रकरण उघड; पाचगणी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अटकेत

गिरीस्थान टाईम्स  वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी पाचगणी पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करत आरोपीस अटक केली असून पीडित मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०८/२५ अन्वये मा. न्या. सं. कलम १३७…

Read More

पाचगणी नगरपरिषदेत ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’ सत्तेवर; आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत नोंदणी  

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे स्थानिक मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी (प्रणित) अपक्षांनी घवघवीत यश मिळवत नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. नगरपरिषदेतील १५ अपक्ष नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदावरही अपक्ष उमेदवाराने बाजी मारल्याने एकूण १६ सदस्यांच्या बळावर ‘श्री घाटजाई शहर विकास आघाडी’च्या…

Read More

रात्रीच्या घरफोड्यांबाबत पाचगणी पोलिसांचा सतर्कतेचा इशारा वाई–जावळी परिसरात सक्रिय टोळ्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचे आवाहन

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : आपल्या लगतच्या वाई व जावळी तालुक्यातील पसरणी, भुईंज आणि मेढा परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास घरफोडी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाचगणी पोलिसांनी आपल्या हद्दीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.   पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अद्याप अशा प्रकारची कोणतीही घटना…

Read More

वालुथ गावच्या दोन सुपुत्रांचा अभिमानास्पद गौरव; सैन्यदलातील लेफ्टनंट पदी निवड व पोलीस सेवेत पदोन्नती बद्दल भव्य सत्कार

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : वालुथ गावचे सुपुत्र साहील मानसिंग पोफळे यांची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल तसेच शशीकांत कृष्णा गोळे (आण्णा) यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल वालुथ ग्रामस्थांच्या वतीने भैरवनाथ मंदिरात प्रांगणात भव्य सत्कार नुकताच जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना राजपुरे म्हणाले…

Read More

वृद्ध महिलेला मारहाण करत चोरट्यांनी ऐवज लुटला पसरणीतील पहाटेची जबरी चोरी; नागरिकांत भीतीचे वातावरण

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा वाई : पसरणी (ता. वाई) येथे आज पहाटे साडेतीनच्या सुमारास धक्कादायक जबरी चोरीची घटना घडली. सुषमा नगर परिसरातील एका बंगल्यात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेला मारहाण करून चोरट्यांनी सुमारे पन्नास हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पसरणी येथील शांताबाई…

Read More

बदलती राजकीय गणिते ठरली कऱ्हाडकर गटाच्या पराभवाला कारणीभूत…! आत्मविश्वासाचा अतिरेक : तिरंगी चौरंगी लढती अन् मतविभागणीचा फटका..

(*सविस्तर विश्लेषण* 🙂  गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेत सलग पंधरा वर्षे सत्ता अबाधित राखणाऱ्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांना यावेळी अपेक्षित यश मिळू शकले नाही. शहरातील प्रत्येक मतदाराशी व्यक्तिगत संपर्क, संघटन कौशल्य आणि धुरंधर राजकारणी म्हणून ओळख असूनही त्यांना यावेळी पराभवाचे वास्तव स्वीकारावे लागले. हा पराभव केवळ निवडणूक निकालापुरता मर्यादित नसून, बदलत्या राजकीय…

Read More

पाचगणी नगरपरिषदेत सत्तांतराचा राजकीय भूकंप ; राष्ट्रवादी नेतृत्वाची रणनीती यशस्वी, १५ वर्षांची एकहाती सत्ता उद्ध्वस्त

(सविस्तर विश्लेषण 🙂 गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या राजकारणाची दिशा बदलणारा हा निर्णायक टप्पा आहे. तब्बल १५ वर्षे चाललेली एकहाती सत्ता कोसळवत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित अपक्षांनी नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. एकूण २१ जागांपैकी तब्बल १५ जागांवर घवघवीत यश मिळवत विरोधी कऱ्हाडकरा गटाला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. यामागे राष्ट्रवादी नेतृत्वाची छुपी…

Read More
error: Content is protected !!