पाचगणी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; १३० निवडणूक कर्मचाऱ्याची नियुक्ती तर सुरक्षेसाठी १२६ जणांचा फौजफाटा तैनात..
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या आज निवडणूक होत असून १० प्रभागातून २०+१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत. त्याकरिता निवडणूक प्रशासनाने आज १३ मतदान केंद्रावर १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना निवडणूक साहित्याचे वाटप केले तर पोलिस प्रशासनाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता १२६ जणांचा फौजफाटा तैनात केला आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे….

