पाचगणीमध्ये दिवाळी फराळाच्या निमित्ताने इच्छुक मतदारांच्या दारी; पालिका निवडणूक फंडा सुरू.
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नऊ वर्षे प्रदीर्घ काळ लांबलेल्या पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी ऐन दिवाळीत गोड मिठाईने सुरू आहे. तर आत्मविश्वास असणाऱ्या उमेदवारांनी अंतर्गत गाठीभेटींवर जोर दिल्याने अशी नावे चर्चेस्थानी आहेत. तर दुसऱ्या बाजूला नगरसेवकपदाची स्वप्न पाहणाऱ्या पावसाळ्यातील भूछत्री सारख्या उगविणाऱ्यांची ओळख पाचगणीकरांना नक्कीच आहे. हे गृहीत धरून मतदारांनी ही आपली मानसिकता बदलली आहे. तर शर्यतीतून ऐनवेळी माघारी घेणाऱ्या काही सराईत उमेदवारांबद्दलही गरीबी हटाव योजनेची पण जबरदस्त चर्चा आहे.

पाचगणी नगरपालिकेमध्ये प्रभाग संख्येत दोन ने वाढ झाल्यामुळे तीन नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या तसेच नगरसेवक होऊ पहाणाऱ्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये दीपावली निमित्त घरोघरी फराळ बैठका वाढविल्या आहेत. तर प्रभागात दिपावली शुभेच्छा बॅनर, दीपावली शुभेच्छा पत्रके, किल्ला स्पर्धा, माध्यमातून निवडणूक तयारी करण्याकडे जोर दिला आहे.
. ही निवडणुकीपूर्वीची रंगीत तालीम ठरली आहे. तशा पद्धतीने बैठका सुरू झाल्या आहेत. नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीकरिता आरक्षित झाल्याने अनेकांना नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पडत आहे. त्यातील जे म्होरके आहेत. त्यांना पहिल्याच पायरीवर धोबीपछाड करण्यासाठी अंतर्गत यंत्रणाही कामाला लागलेले आहे.
नोव्हेंबरी – डिसेंबर- महिन्यामध्ये थंडीचा महिना असतो. अशा वेळेला मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी उब द्यावी लागणार आहे. त्याचीही तरतूद इच्छुकांना करावी लागेल हाच धागा पकडून आघाडी पॅनल मधून
नेत्यांनीही नगराध्यक्षपदाचा उमेदवाराची चाचपणी करताना त्याची आर्थिक परिस्थिती व समाजातील स्थान आणि पक्षनिष्ठा व नवीन चेहरा पाहून याची सांगड घातली जाणार आहे.

