उत्कर्ष पतसंस्था पाचगणी शाखेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Spread the love

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई शाखा पाचगणीचा तिसरा वर्धापन दिन आज पाचगणी येथील शाखा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने परिसरातील अनेक मान्यवर, सभासद व नागरिकांनी शाखेला सदिच्छा भेटी देत शुभेच्छांचा वर्षाव केला.

या कार्यक्रमाला पाचगणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र पारटे, अंकुश मालुसरे, नामदेव चोपडे, सुजाता पारटे, यशवंत पारटे यांच्यासह श्रीराम उत्सव समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी उत्कर्ष पतसंस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेत सहकार क्षेत्रातील तिच्या योगदानाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

यावेळी बोलताना नगरसेवक अंकुश मालुसरे यांनी सांगितले की, उत्कर्ष पतसंस्था ही सभासदांचे हित जपणारी संस्था असून गरजूंना आर्थिक आधार देत त्यांच्या अडीअडचणीत तारणहार ठरली आहे. अल्पावधीतच पाचगणी परिसरात उत्कर्ष पतसंस्थेने विश्वासार्हता निर्माण करत खऱ्या अर्थाने ‘उत्कर्ष’ साधला असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाखा प्रमुख जितेंद्र मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी महादेव भगत, प्रमोद कदम, शीतल कळंबे व रविराज देखणे यांनी वर्धापन दिन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अल्पावधीतच सभासदांचा विश्वास संपादन करून प्रगतीच्या दिशेने भक्कम पावले टाकणारी उत्कर्ष पतसंस्था पाचगणी शाखा भविष्यातही सहकार चळवळ अधिक बळकट करेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!