पाचगणीत भेकराच्या पिल्लाची नागरी वस्तीत धाव; प्राचार्य कक्षात घेतला आश्रय कुत्र्यांच्या पाठलागाने घाबरलेले पिल्लू अखेर रेस्क्यू टीमकडून वनविभागाच्या ताब्यात
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी शहरात सोमवारी दुपारी एक अनोखी आणि तितकीच हृदयस्पर्शी घटना घडली. जंगलातून भरकटून आलेले हरीण कुळातील ‘भेकर’ या वन्यप्राण्याचे पिल्लू नागरी वस्तीत शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने जीवाच्या भीतीने सैरभैर झालेल्या या भेकराच्या पिल्लाने अखेर श्रीमती मिनलबेन मेहता कॉलेजमध्ये धाव घेत थेट प्राचार्य कक्षात आश्रय घेतला. प्राचार्यांच्या…

