Category: Politics
भिलार ‘पुस्तकांच्या गाव’ प्रकल्प कार्यालयाला जयदीप कवाडे यांची सदिच्छा भेट, अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा व आढावा..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : ‘पुस्तकांच्या गाव’ (भिलार) उपक्रमाला नुकतीच मा. जयदीपभाई जोगेंद्र कवाडे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ – राज्यमंत्री दर्जा, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष – पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अध्यक्ष – द पीपल्स फाउंडेशन) यांनी सदिच्छा भेट देत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन प्रकल्पाची प्रशंसा केली. भिलार, तालुका महाबळेश्वर…
फटाके- गुलाल आणि ढोल ताशा तयार पण जि. प. नूतन अध्यक्षाचा पत्ता नाही
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :: – (अजित जगताप). सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर गेली महिनाभर प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या गळ्यात पडणार? हे गुलदस्त्यात आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी अद्याप कोणत्या पक्षाचा कोण अध्यक्ष होणार? हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे गुलाल- फटाके- ढोल ताशा तयार आहे पण अध्यक्षाचा…
महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शकुंतला चोरमले, उपसभापतीपदी संजय मोरे बिनविरोध
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज पार पडली असून सभापतीपदी शकुंतला रमेश चोरमले तर उपसभापतीपदी संजय हरिश्चंद्र मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे महाबळेश्वर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीची सत्ता स्थापन झाली आहे. महाबळेश्वर पंचायत समितीची निवडणूक…
भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत पाचगणीला स्थान; मंगेश उपाध्याय उपाध्यक्ष, मेहुल पुरोहित चिटणीस
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नव्या जिल्हा पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून या निवडीत महाबळेश्वर तालुक्याला महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे दिसून येत आहे. पाचगणी शहरातील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मंगेश उपाध्याय यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी, तर मेहुल पुरोहित यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ….
कुसुंबी गणातील गावांना अंकुश (बाबा) कदम यांचा आभार दौरा; मतदारांशी साधला संवाद
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी केल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी नवी मुंबईचे संपर्कप्रमुख तसेच नवनिर्वाचित नवी मुंबई महानगरपालिका विस्कृत नगरसेवक अंकुश (बाबा) कदम यांनी जावली दक्षिणमधील कुसुंबी गणातील विविध गावांचा दौरा केला. या आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी ऐकीव मुरा, चिकनवाडी, मोळेश्वर, आपटी मुरा, आखाडे वस्ती,…
“माझी लढाई विठ्ठलाशी नाही, बडव्यांशी आहे” – शशिकांत शिंदेंची अप्रत्यक्ष टीका; करहरमध्ये राष्ट्रवादीची जोरदार सांगता सभा
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : “माझी लढाई विठ्ठलाशी नाही, तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे” अशा शब्दांत शिवेंद्रराजे समर्थकांवर यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी अप्रत्यक्ष शाब्दिक घणाघात केला. करहर (ता. जावळी) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखेरच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते….
भ्रष्टाचाराच्या आरोपाखालीलांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत” – करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर घणाघात
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : “ज्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे कच्चे चिट्ठे न्यायालयात आहेत आणि ज्यांच्यावर थेट आरोपपत्र दाखल आहे, त्यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नयेत. मी जनतेच्या दारात जाणारा माणूस आहे, पैशाच्या दारात फिरणारा ठेकेदार नाही. माझ्या नादाला लागला तर याद राखा, मी लुंग्या-सुंग्या नाही, छत्रपतींची औलाद आहे,” अशा आक्रमक शब्दांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करहर…
“भिलार गणात ‘लाडक्या बहिणी’चा जलवा – महिला मतदारांचा सुप्रिया भिलारे यांना उत्स्फूर्त पाठिंबा”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गणातील प्रत्येक गावात भाजपच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांना मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश झाल्याने अवघ्या काही तासांतच प्रचाराला अधिकच वेग आला असून संपूर्ण परिसर निवडणूकमय झाला आहे. ‘लाडक्या बहिणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…
भिलार गटात ‘घड्याळा’ची वेळ सुरू – विक्रमी मतांनी राष्ट्रवादीचा विजय निश्चित”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गटातील गटांतर्गत गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हाचा प्रचार सध्या जोमात सुरू असून, “कुणाची वेळ कुठे हवी हे मतदारांनी ठरवले आहे आणि विकासासाठी फक्त राष्ट्रवादी हाच पर्याय आहे,” असा ठाम विश्वास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जावळी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्रशेठ राजपुरे यांनी व्यक्त केला आहे. भिलार…
ओबीसीच्या आरक्षणावर लढणाऱ्या मराठा कुणबी उमेदवारांना ओबीसींनी मतदान करू नये : अध्यक्ष भरत लोकरे
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा सातारा : जावली तालुका येथील ३६ म्हसवे गटाचे अपक्ष उमेदवार श्री. संतोष दिनकर शिराळे यांच्या प्रचारार्थ करंदी, करंजोशी, नेवेकरवाडी, रानगेघर आलेवाडी, दरे, धोंडेवाडी, करहर येथे जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे, लोहार सुतार समाजाचे अध्यक्ष माधव लोहार, महाबळेश्वर ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार, लोहार-सुतार संघटनेचे कार्याध्यक्ष हनुमंत मोने, सहसचिव संतोष सपकाळ यांचा…

