सुरूर–पोलादपूर राज्यमार्गाचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे ठेकेदाराचे मंत्री महोदयांना आश्वासन; मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सुरूर–पोलादपूर राज्यमार्गावरील गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संथ गतीच्या कामामुळे नागरिक, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत MSRDC च्या अधिकाऱ्यांसोबत पाचगणी–महाबळेश्वर येथील शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली….

Read More

हुमगाव–वाई मार्गास प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा; जावळीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न होणार साकार..!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी व वाई तालुक्यांना जोडणाऱ्या हुमगाव–वाई या महत्त्वाच्या ग्रामीण मार्गाला अखेर प्रमुख जिल्हा मार्गाची दर्जोन्नती मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय काढून या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. शासन निर्णय क्रमांक रवियो-२०२६/प्र.क्र.०८/नियोजन-२ मंत्रालय, मुंबई येथे निर्गमित करण्यात आला असून जावळीकरांचे अनेक वर्षांचे रस्त्याचे स्वप्न…

Read More

भिलारमध्ये अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात ‘यशदा’च्या वैद्यकीय प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची काव्यरंगत; पदयात्रा व पुष्पहार अर्पणाने कार्यक्रमाची सांगता

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन भिलार येथील ‘पुस्तकांचं गाव’ प्रकल्प कार्यालयाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी (यशदा)…

Read More

पाचगणी नगरपरिषद नगराध्यक्ष केबिनचे नूतनीकरण; वाढीव सदस्यसंख्येमुळे आसनव्यवस्थेची समस्या दूर

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर नव्याने वाढ झालेल्या प्रभाग रचनेमुळे नगरपरिषदेतील सदस्यसंख्या वाढली असून, त्यानुसार नगराध्यक्ष केबिनमधील आसनव्यवस्था अपुरी पडत होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष केबिनचे नूतनीकरण करण्यात आले असून नव्या केबिनचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. पूर्वी पाचगणी नगरपरिषदेची सदस्यसंख्या १७ असून नगराध्यक्षासह ती १८…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ अनुषंगाने महाबळेश्वर तालुक्यात दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही मतदान प्रक्रिया सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत शांततामय व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून प्रशासनाने त्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी भिलार व…

Read More

पाचगणीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; ३५ शाळांचा भव्य लाँगमार्च आकर्षण..! कै. भिलारे क्रीडांगणावर नेत्रदीपक देशभक्ती विविध गुणदर्शन कार्यक्रम..

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोमवार, २६ जानेवारी रोजी पाचगणीमध्ये अत्यंत उत्साहवर्धक, शिस्तबद्ध आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शहरात राष्ट्रप्रेमाचे वारे वाहू लागले होते. विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने हा दिवस अधिकच संस्मरणीय ठरला. प्रथमतः नगरपालिकेच्या आवारात सकाळी ८ वाजता उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांच्या हस्ते…

Read More

पाचगणीत रस्ते दुरुस्तीला वेग, मूलभूत सुविधांवर नगरपरिषदेचा भर”नवनिर्वाचितांचा लोकाभिमुख पुढाकार

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेविका व नगरसेवकांनी कार्यभार स्वीकारताच आपल्या-आपल्या प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नगरपरिषद अधिक सक्रिय झाली असून, शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या…

Read More

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत कडक पोलीस बंदोबस्त; हॉटेल-लॉज-बंगल्यांना नोटिसा, अमली पदार्थांवर करडी नजर.

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नवीन वर्ष २०२६ अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपले असताना संपूर्ण सातारा जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. जावळी तालुक्यातील सावरी येथे मुंबई क्राईम ब्रँचने तब्बल ११५ कोटी रुपयांच्या ड्रग फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर काही दिवसांतच पाचगणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या संयुक्त कारवाईत मुंबईस्थित १० आरोपींना ताब्यात…

Read More

पाचगणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन; शहरात सुरक्षेची कडक व्यवस्था

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नगरपरिषद निवडणुक २ डिसेंबर रोजी होत आहे. यापार्श्वभूमीवर पाचगणी शहरात पोलिसांनी भव्य संचलन करत सुरक्षेची कडक तयारी दाखवली. शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, पर्यटन क्षेत्रांसह संवेदनशील प्रभागांत पथसंचलन करून पोलिसांनी सज्जतेचा संदेश दिला. मतदारांमध्ये विश्वास वाढवण, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि कोणत्याही अनावश्यक गोंधळाला आळा घालणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पोलिस…

Read More

बोपर्डी ग्रामपंचायत बनली मुख्यमंत्री पंचायत राज आदर्श.. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रशासकीय कामाची दखल..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : बोपर्डी (ता. वाई) ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे सुरू असून, गाव विकासाच्या नव्या टप्प्यावर वाटचाल करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने प्रशासकीय स्तरावरही बोपर्डीच्या कामाचे कौतुक केले जात आहे. अभियानांतर्गत वनराई बंधारे, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर…

Read More
error: Content is protected !!