Headlines

महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापतीपदी शकुंतला चोरमले, उपसभापतीपदी संजय मोरे बिनविरोध

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड आज पार पडली असून सभापतीपदी शकुंतला रमेश चोरमले तर उपसभापतीपदी संजय हरिश्चंद्र मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे महाबळेश्वर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीची सत्ता स्थापन झाली आहे. महाबळेश्वर पंचायत समितीची निवडणूक…

Read More

परदेशात राहूनही गावासाठी धडपड : चंदनदादा चव्हाण यांच्याकडून १० गावांना सौर पथदिवे, ५ गावांना शुद्ध पाणी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील दाभे मोहन गावचे सुपुत्र आणि इटलीस्थित उद्योजक श्री. चंदन सुनीता राजाराम चव्हाण (चंदनदादा) यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असून त्यातून अनेक गावांना प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. सौरऊर्जा आणि शुद्ध पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी गावकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे….

Read More

सुरूर–पोलादपूर राज्यमार्गाचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे ठेकेदाराचे मंत्री महोदयांना आश्वासन; मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सुरूर–पोलादपूर राज्यमार्गावरील गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या संथ गतीच्या कामामुळे नागरिक, व्यापारी तसेच पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत MSRDC च्या अधिकाऱ्यांसोबत पाचगणी–महाबळेश्वर येथील शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली….

Read More

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत पाणीटंचाई : नगरसेवक प्रसाद कारंजकर यांची निवेदनाद्वारे टंचाई टाळण्यासाठी नगरपरिषदेस आर्तहाक

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी पाचगणी नगरपरिषद हद्दीतील जिवंत विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करून त्यातील गाळ काढून पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशा आशयाचे निवेदन नगरसेवक प्रसाद कारंजकर त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील तसेच नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांना देऊन निवेदनाद्वारे पाणी टंचाईवर उपाययोजनांची आर्तहाक दिली आहे…

Read More

पाचवड–पार्टेवाडी मार्गावर सकाळची नवी एसटी सेवा सुरू; प्रवाशांची दीर्घ प्रतीक्षा संपली

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचवड–पार्टेवाडी मार्गावरील प्रवाशांच्या सातत्यपूर्ण मागणीची दखल घेत मेढा आगाराच्या वतीने सकाळच्या सत्रात नवीन एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर सकाळी ७:४५ वाजता पार्टेवाडीहून पाचवडकडे येणारी ही नवी बस आजपासून सुरू झाली असून त्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच नियमित प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाचवड–पार्टेवाडी ही एसटी सेवा…

Read More

महिला दिनानिमित्त पाचगणीत सुरेल संगीत मैफल; नगरसेवक प्रसाद कारंजकर यांच्या उपक्रमाचे कौतुक

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून पाचगणी शहरात सुरेल संगीताची मैफल रंगली. पाचगणी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या सुरमय सुस्वर संगीत रजनी कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमातून स्थानिक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली, तसेच उपस्थित महिलांचा विशेष सन्मानही करण्यात आला. प्रथमतः…

Read More

कासवंड (घामुनसेवाडी ) मध्ये रात्रीची चोरी करणारे चोर पाचगणी पोलिसांच्या ताब्यात; १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.. 

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : बांधकाम साईटवरून लोखंडी गज चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पाचगणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढत ताब्यात घेत. त्यांचेकडून या कारवाईत चोरीस गेलेला सुमारे १ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे. याबाबतची पोलिस स्टेशन मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. ६ मार्च…

Read More

महिला दिनानिमित्त विशेष लेख जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाचा प्रवास – डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे

“आज रास्ता बना लिया है, तो कल मंजिल भी मिल जाएगी, हौसलों भरी यह कोशिश एक दिन जरूर कामयाबी लाएगी.” या ओळी ज्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा सार सांगतात, त्या म्हणजे भिलार या “पुस्तकांच्या गावातील” कर्तृत्ववान, ध्येयवेड्या आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात सातत्याने कार्य करत त्यांनी समाजात आपले स्वतंत्र…

Read More

भाजपच्या जिल्हा कार्यकारणीत पाचगणीला स्थान; मंगेश उपाध्याय उपाध्यक्ष, मेहुल पुरोहित चिटणीस

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नव्या जिल्हा पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून या निवडीत महाबळेश्वर तालुक्याला महत्त्वाचे स्थान मिळाल्याचे दिसून येत आहे. पाचगणी शहरातील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मंगेश उपाध्याय यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी, तर मेहुल पुरोहित यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ….

Read More

सुरूर–पोलादपूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात पाचगणी बंदचा निर्णय; रविवारी पर्यटनस्थळ पूर्ण दिवस बंद

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :सुरूर–पोलादपूर मार्गाच्या धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाने सुरू असलेल्या कामाविरोधात पाचगणीकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून याच निषेधार्थ रविवारी (८ मार्च) संपूर्ण दिवसभर पाचगणी पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. पाचगणी–महाबळेश्वर मार्ग चार महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आल्यामुळे पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून स्थानिक व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याची…

Read More
error: Content is protected !!