समीर गोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : जावळी तालुका शिवसेना तालुका प्रमुख समीर गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त सरताळे (कापसेवाडी) येथील महंत अबानंदगिरी ट्रस्ट संचालित गगनगिरी विद्यार्थी वसतीगृह (आश्रमशाळा) येथे विद्यार्थ्यांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.“आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून जावळी तालुका शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

या उपक्रमामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली. समाजातील वंचित घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे हीच खरी वाढदिवस साजरा करण्याची अर्थपूर्ण पद्धत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित शिवाजी काकासाहेब शेलार (पोलीस मित्र युवा क्रांती प्रदेशाध्यक्ष), श्रीरंग गलगले (जिल्हाप्रमुख, शेतकरी सेना), अविनाश पवार (तालुका प्रमुख, शेतकरी सेना), अमरदीप तरडे (उपतालुका प्रमुख), सुरेश सणस (उपसरपंच, भोगवली), गणेश निकम (विभाग प्रमुख), सुधीर करंदकर (युवा सेना पदाधिकारी), शुभम विधाते (युवा सेना पदाधिकारी),दत्ता पोफळे (ज्येष्ठ शिवसैनिक), प्रकाश गोळे, प्रवीण गोळे, आदेश गावडे, प्रणित ढमाळ , गणेश गोळे, राज गोळे तसेच इतर शिवसैनिक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समीर गोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, शिवसेनेच्या ब्रीद वाक्यानुसार ८०% समाजकारण २०% राजकारण भविष्यातही अशा समाजोपयोगी कार्यांद्वारे समाजसेवेची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!