जावली तालुक्याच्या जनतेसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता नागरिक कक्ष’चा भव्य शुभारंभ शासन योजना, समस्या निवारण व जनतेच्या प्रश्नांसाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी, समस्या व शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता नागरिक कक्ष सुरू करण्यात आला असून, या कक्षाचा भव्य शुभारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख सातारा श्री. संदीप पवार यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या कक्षाचे उद्घाटन श्री. अंकुश बाबा कदम (संपर्कप्रमुख, नवी मुंबई) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या शुभारंभ कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संदीप पवार, श्री. संजय सुर्वे (मेढा शहर प्रमुख), श्री. रणधीर गोरे (नगरसेवक, मेढा), श्री. बापूसाहेब जवळ (नगरसेवक, मेढा), श्री. सिताराम पवार (सरपंच, मालेघर), श्री. श्रीरंग गलगले (सरपंच, रामवाडी), श्री. समीर गोळे (जावली तालुका अध्यक्ष), श्री. सतीश पवार (तालुका अध्यक्ष, शिव उद्योग सहकार सेना), उद्योजक श्री. गणेश निकम यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंकुश बाबा कदम म्हणाले की, “धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या या सहाय्यता नागरिक कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजना, समस्या निवारण तसेच प्रशासकीय प्रश्नांसाठी एक सक्षम व प्रभावी व्यासपीठ मिळणार आहे. जावली तालुक्यातील नागरिकांनी या कक्षाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

तसेच त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संदीप पवार यांच्या सामाजिक, जनहिताच्या व लोकाभिमुख कार्याचे विशेष कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमामुळे जावली तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना एक विश्वासार्ह, तत्पर व प्रभावी सहाय्यता केंद्र उपलब्ध झाले असून, भविष्यात हा कक्ष नागरिकांसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!