भिलार ‘पुस्तकांच्या गाव’ प्रकल्प कार्यालयाला जयदीप कवाडे यांची सदिच्छा भेट, अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा व आढावा..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : ‘पुस्तकांच्या गाव’ (भिलार) उपक्रमाला नुकतीच मा. जयदीपभाई जोगेंद्र कवाडे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ – राज्यमंत्री दर्जा, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष – पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अध्यक्ष – द पीपल्स फाउंडेशन) यांनी सदिच्छा भेट देत प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करीत कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन प्रकल्पाची प्रशंसा केली.

भिलार, तालुका महाबळेश्वर या भेटीदरम्यान जयदीप कवाडे यांनी प्रकल्प कार्यालयात ‘पुस्तकांच्या गाव’ संकल्पनेची पार्श्वभूमी, सध्याची प्रगती, आगामी नियोजन तसेच स्थानिक नागरिकांसाठी निर्माण होणाऱ्या संधी यावर सखोल चर्चा झाली. ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजविण्याबरोबरच पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी नी व्यक्त केले.
या प्रसंगी कपिल लिंगायत, पुणे जिल्हाध्यक्ष अमित सोनवणे, नागपूर जिल्हाध्यक्ष पलाश तावरे, सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, पूनम निलेश गोळे, शिवराज उद्योग समूहाचे निलेश गोकुळ गोळे, युवा उद्योजक अनमोल अशोक कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रगतशील व्यावसायिक संजय भिलारे, विकास पिसाळ, गोविंद गोळे, प्रताप भिलारे, महाबळेश्वर जावळी बाजार समितीचे संचालक राजेंद्र भिलारे, भाजप जिल्हा सरचिटणीस वैशाली भिलारे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सातारा जिल्हाध्यक्ष नितीन वन्ने, माजी सैनिक दिलीप पवार, व्यावसायिक विजय पवार, विपुल जाधव आदींनीही सहभाग नोंदविला. यांच्यासह संजय वन्ने, विनीत मोरे, योगेश जाधव, मंगेश मोरे, राहुल माने, सचिन अंबिके आणि इतर हितचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रकल्प कार्यालयात विविध उपक्रमांची माहिती घेताना मान्यवरांनी स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी अधिक वाढविण्याची गरज व्यक्त केली. तसेच ‘पुस्तकांच्या गाव’ या संकल्पनेचा विस्तार करून ती राज्यस्तरावर एक आदर्श मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. या भेटीमुळे ‘पुस्तकांच्या गाव’ उपक्रमाला नवी दिशा मिळणार असून, भविष्यात या प्रकल्पाच्या अधिक व्यापक विस्ताराची आशा व्यक्त केली जात आहे.

