Shristi

अर्ज माघारीनंतर महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; २१ उमेदवार रिंगणात, तळदेव गणात चौरंगी कुंभरोशीमध्ये पंचरंगी लढती ; भिलार गटात महायुतीत रंगणार सामना..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १७ उमेदवारांनी आपले २९ उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता एकूण २१ उमेदवार अंतिम रिंगणात उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून तळदेव मध्ये चौरंगी तर कुंभरोशीत पंचरंगी…

Read More

केट्स पॉईंट येथे १७ वर्षीय युवकाचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू; मिसिंग प्रकरणाचा झाला उलगडा..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ केट्स पॉईंट परिसरात खोल दरीत पडून एका १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भगवतसिंह मदनसिंह सोलंकी (वय १७, रा. ढेबेवाडी, ता. पाटण, जि. सातारा) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, भगवतसिंह सोलंकी हा दि. २३ जानेवारी…

Read More

“निष्ठेची मशाल हाती घेऊन मिलिंद नलावडे रिंगणात; म्हसवे गटात ठाकरे सेनेचा विजयाचा निर्धार” “आता नाही तर कधीच नाही! म्हसवे गटात निष्ठावंतांचा एल्गार, मिलिंद नलावडेंना जनतेचा उस्फूर्त पाठिंबा”

“आता नाही तर कधीच नाही! म्हसवे गटात निष्ठावंतांचा एल्गार, मिलिंद नलावडेंना जनतेचा उस्फूर्त पाठिंबा”   गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या म्हसवे गटाची निवडणूक यावेळी केवळ राजकीय स्पर्धा न राहता, निष्ठा, विश्वास आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची लढाई बनली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी, खर्शी गण आणि म्हसवे गटात सामान्य…

Read More

कौसल्या भिलारेंच्या भिलार गणातील उमेदवारीने ट्विस्ट वाढला..अपक्ष उमेदवारीवरून संभ्रम; २७ तारखेपर्यंत उत्सुकता शिगेला

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या भिलार गणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून कौशल्या भिलारे यांच्या अपक्ष उमेदवारीने भिलार गणात राजकीय वर्चस्वाच्या लढाईत पाठिंबा वाढत आहे. शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख संभाजी भिलारे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात भाजपला मोठे बळ; विविध पक्षांतील पदाधिकारी व ग्रामस्थांचा जाहीर प्रवेश

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत. विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपमध्ये सामील होत असल्याने तालुक्यात भाजपचे संघटनात्मक बळ लक्षणीयरीत्या वाढले आहे. या घडामोडींचा थेट फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये…

Read More

महाराष्ट्र राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत साताऱ्याच्या श्रेयश मानेला सुवर्णयश; ५२ – ५६ किलो वयोगटात प्रथम क्रमांक

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मूर्तिजापूर  (जि. अकोला) येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत ५२ ते ५६ किलो वजनी गटात साताऱ्याच्या श्रेयश दीपक माने याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. राज्यभरातील दर्जेदार खेळाडूंशी लढत देत श्रेयशने दाखवलेली ताकद, तंत्र आणि आत्मविश्वास यामुळे त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. श्रेयशला बॉक्सिंगचे शास्त्रशुद्ध आणि…

Read More

टेबल लँड स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार; २५० किलो कचऱ्याची विल्हेवाट

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणीतील सुप्रसिद्ध टेबल लँड परिसर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी रोटरॅक्ट क्लब, पाचगणी यांच्या पुढाकाराने गुरुवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी “बटरफ्लाय गार्डन ते टेबल लँड” या मार्गावर भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद, हिलदारी व विद्या निकेतन हायस्कूल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मोहिमेत एकूण ४०…

Read More

बिलीमोरिया “आरंभ” महोत्सवाचे उद्घाटन ; भारतातील नामांकित विद्यापीठे सहभागी होणार..! 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नाविण्यपूर्ण कृतिशील शैक्षणिक उपक्रमांतर्गत कलेतून ज्ञानप्राप्ती या उद्दिष्टाला केंद्रस्थानी ठेवून व्यवसायाभिमुख शिक्षण देणाऱ्या पाचगणीतील बिलिमोरिया हायस्कूलमध्ये ‘आरंभ’ या भव्य शैक्षणिक व सांस्कृतिक महोत्सवाचे आज मोठ्या दिमाखात उद्घाटन अदिती एज्युकेशनचे संस्थापक चेअरमन अरुणभाई गोराडिया, संचालिका अदिती गोराडिया, पीयूष कामदार, यांच्या हस्ते करण्यात आले. बिलीमोरिया हायस्कूलच्या ग्राऊंडवर २३ जानेवारी ते २५ जानेवारी…

Read More

माघी गणेश जयंती उत्सवाच्या  मुहूर्तावर विठ्ठल गोळेंच्या प्रचाराचा श्रीगणेशा; आमदार शशिकांत शिंदेंनी घेतले गणेशाचे दर्शन

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार धावपळ सुरू आहे. अशा ऐन निवडणूक रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रुईघर (गणेशपेठ) येथील प्रसिद्ध गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. याच शुभमुहूर्तावर खर्शी–बारामुरे गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल गोळे यांच्या प्रचाराचा औपचारिक…

Read More

लोकशाहीला साथ, विकासाला मत’चा नारा देत सुशील गोळेंचा उमेदवारी अर्ज दाखल; खर्शी–बारामुरे गणात उत्साहाचे वातावरण

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, युवकांच्या प्रश्नांची अचूक जाण आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क असलेले धडाडीचे युवा नेते श्री. सुशील विष्णू गोळे यांनी आज खर्शी–बारामुरे गण पंचायत समिती निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत ‘लोकशाहीला साथ, विकासाला मत’ असा नारा देत परिसर दणाणून सोडला. सुशील…

Read More
error: Content is protected !!