पूनमताईने प्रचारात उठवलंय रान जनामनात “धनुष्यबाण”   प्रतिष्ठेच्या भिलार गणात शिवसेनेच्या  विजयाची हीच खरी  नांदी..! 

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गणातील यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून या गणात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या रणांगणात शिंदेसेनेच्या उमेदवार पूनमताई कांबळे–गोळे यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकत आघाडी घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावोगावी सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, जनतेकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाचा गुलाल जणू आत्ताच उधळला जात असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिंदेसेनेच्या प्रवासात अनुभवी, कार्यक्षम व माजी तालुकाप्रमुख म्हणून ओळख असलेल्या पूनमताई गोळे यांनी भिलार गणातून ठामपणे शड्डू ठोकला आहे. निवडून येण्याचा निर्धार मनाशी बाळगून त्या प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून, त्यांनी पहिली प्रचार फेरी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. आता दुसऱ्या फेरीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून त्या गावोगावी फिरत थेट मतदारांशी संवाद साधत आहेत.

या प्रचारात त्यांना श्री. निलेश गोळे यांची “सौ” भक्कम साथ लाभत आहे. ते घरोघरी भेटीगाठी घेत मतदारांशी संवाद साधत असून, पूनमताई या जनतेच्या हक्काच्या उमेदवार असल्याचे सांगत धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. प्रचाराच्या रणांगणात निलेश गोळे यांनी चांगलीच राळ उठवली असून, प्रचार अधिक प्रभावी होत आहे.

याचबरोबर पाचगणी शहर प्रमुख राहुल शिंदे, मंगेश, योगेश जाधव, सचिन अंबिके, अमित प्रभाळे, तर बंधू अनमोल कांबळे हेही बहिणीच्या प्रचारासाठी गावोगावी फिरत असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहेत. शिंदेसेनेच्या संघटनात्मक ताकदीसह होत असलेल्या या प्रचारामुळे भिलार गणात वेगळेच राजकीय वातावरण तयार झाले आहे.

मतदारांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि प्रचारातील आघाडी पाहता, पूनमताई गोळे यांची वाटचाल विजयाच्या दिशेने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भिलार गणातील निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!