प्रस्थापितांना घरी बसवण्याचा विडा” : म्हसवे गटात सर्वपक्षीय महाआघाडीची ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन रॅली
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर: म्हसवे जिल्हा परिषद गट आणि गणाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, आज सर्वपक्षीय उमेदवारांनी काढलेल्या ऐतिहासिक प्रचार रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. “प्रत्येक वेळी मीच उमेदवार” म्हणणाऱ्या प्रस्थापितांना घरी बसवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या पोराला सत्तेत बसवण्यासाठी ही निवडणूक असल्याचे जाहीर करत शिवसेनेचे (शिंदे गट) संदीप पवार यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं…

