“राष्ट्रीय समाज पक्ष पाटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच जागांसाठी उमेदवार उभे करणार “शेतकरी, युवक, महिलांचा खरा आवाज बनणार राष्ट्रीय समाज पक्ष — विकास कदम”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेऊन पाटण तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) या पक्षाने देखील तालुक्यातून ताकदीनं उमेदवारी देण्याची घोषणा केली असून, त्यामुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला आहे. ही घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष विकास संभाजी कदम…

