शेंद्रे सातारा येथील “अजिंक्यतारा” संकुलात पोफळे – गायकवाड परिवारातील वर अजिंक्य व वधू स्नेहा यांचा विवाह थाटामाटात साजरा; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती..!

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा सातारा : शेंद्रे (सातारा) येथिल स्व आ. श्रीमंत छत्रपती अभयसिंह महाराज भोसले सांस्कृतिक भवन अजिंक्यतारा विवाह संकुलात चंद्रकांत पोफळे यांचे पुतणे व मधुकरराव पोफळे (रामवाडी, तालुका जावळी) यांचे चिरंजीव अजिंक्य व कै. गणपतराव गायकवाड (हुपरी, तालुका हातकणंगले,) यांची नात, व संजय गायकवाड यांची कन्या स्नेहा यांचा शुभ – विवाह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभ आशीर्वादात संपन्न झाला.

अजिंक्यतारा विवाह संकुलात अजिंक्य – स्नेहा यांच्या शुभ विवाह प्रसंगी शुभ आशीर्वाद देण्यास अनेक क्षेत्रातील यामध्ये राजकीय, सांस्कृतिक, सहकार, तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मा. साहेबराव पवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट प्रदेश अध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदे, विधानपरिषदेचे माजी आमदार घार्गे यांच्या सुविध्य पत्नी सौ. इंदिराताई घार्गे, कराड उत्तराचे आमदार मा. मनोज दादा घोरपडे, उद्योजक संग्राम घोरपडे, सिने चित्रपट निर्माते, दिग्दर्शक “आमची माती आमची माणसे” चे मानसिंग बापू पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. वसंतराव मानकुमारे, तसेच दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकचे,  चेअरमन विक्रम भिलारे, योगेश गोळे,  कर्मचारी प्रतिनिधी  अशोक चव्हाण, सुहास गिरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जावळी तालुका प्रमुख नितीन गोळे, प्रतापगडाचे संचालक रामदास पार्टे,  व जावळी सहकारी पतपेढी, चे संचालक, सहकारी शिक्षक मित्र, अन्य क्षेत्रातील विविध मान्यवर या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!