पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेज अध्यक्षपदासाठी संतोष कांबळे प्रबळ दावेदार!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि शहराच्या राजकारणातील एक लोकप्रिय चेहरा संतोष प्रभु कांबळे यांनी आगामी पालिका निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीत दमदार पाऊल ठेवले आहे. सध्या ते अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या ‘छुप्या’ प्रचारात आघाडी घेत असून, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची ‘चार्मिंग’ इमेज अशी वेगळी ओळख होतेय.

संतोष कांबळे यांनी समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले संतोष कांबळे हे पाचगणी शहराच्या विकासासाठी सतत धडपडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. आपल्या मागील कार्यकाळात त्यांनी विशेषतः उपेक्षित आणि वस्ती भागातील नागरिकांसाठी भरीव कामे केली आहेत.

नागरिकांना मूलभूत सुविधा देताना त्यांनी मातंग वस्ती रस्ता आणि नगरपालिका ते भीमनगर रस्ता यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लावली. वस्ती सुधारणा कामी त्यांनी बँकवर्ड हौसिंग सोसायटी ब्लॉक बसवणे, ड्रेनेज सुधारणा आणि रस्त्याचे काम तसेच भीमनगर झोपडपट्टीला ‘म्हाडा’ योजनेत समाविष्ट करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

सामाजिक काम करताना त्यांनी भीमनगर येथील सांस्कृतिक भवन आणि शहराच्या वैभवात भर घालणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन सुशिभिकरणासाठी त्यांनी विशेष पाठपुरावा केला.
समाजहिताची ही कामे करून त्यांनी आपली प्रतिमा केवळ नगरसेवक म्हणून नाही, तर एका ‘लोकसेवक’ म्हणून निर्माण केली आहे.

सध्या पायाला ‘भिंगरी’ बांधून लोकांचा अंदाज संतोष कांबळे घेताहेत! सध्या निवडणुकीचा माहोल तापलेला असताना, संतोष कांबळे यांनी थेट नागरिकांमध्ये मिसळून भेटीगाठी जोर देत असून . ते लोकांचा थेट अंदाज घेत आहेत आणि समस्या ऐकून घेत आहेत. त्यांच्या या सक्रियतेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.

‘मी मैदानात उतरलो आहे कारण…’
निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यामागचे आपले ध्येय स्पष्ट करताना संतोष कांबळे यांनी सांगितले की, पाचगणीसमोर असलेल्या अनेक महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुन्हा रणांगणात येत आहे

” व्हिजन “

“पाचगणीतील चटईक्षेत्र वाढवणे, पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवणे, पर्यटन स्थळे विकसित करणे, कित्येक वर्षापासून प्रलंबित लीज प्रश्न निकाली काढून पालिकेला उत्पादनात वाढ करणे, पार्किंग समस्या, शहर सुधारणा आणि विशेषतः स्वच्छता अभियानाचे काम कायम ठेवून शहराचा क्रमांक टिकवून ठेवणे, हे माझे मुख्य व्हिजन आहे. पाचगणीचे हित हेच माझे सर्वोच्च उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

माजी उपाध्यक्ष म्हणून अनुभव आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेली नाळ यामुळे संतोष कांबळे हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!