पाचगणीत रंगली २३ वर्षांनंतर पुन्हा मित्रांची मैफिल; भारती विद्यापीठ शाळेत लुटला स्नेह मेळाव्याचा आनंद
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पांचगणी : २३ वर्षांनंतर भेट झाली खास, मनात दाटल्या जुन्या प्रत्येक श्वास, केक कापताना हसू-आंसू एकत्र आले,क्षणभर सगळे पुन्हा विद्यार्थी झाले.“पुन्हा भेटलो त्या शाळेच्या दारी,आठवणींची फुलं उमलली पुन्हा सारी,हास्यात मिसळले अश्रू थोडे, बालपण परत आलं क्षणभर खरेखुरे.”

गोडवली(ता.महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ विद्यालयातील दहावीच्या २००२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेत स्नेहमेळाव्याचा आनंद लुटला. या वेळी त्या बॅचचे ६० विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्रित आले होते. त्यांनी त्या वेळच्या म्हणजे २३ वर्षांपूर्वीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.

बालपणातील त्या गोड आठवणी, वर्गातील गडबड, शिक्षकांचे प्रेमळ धडे आणि मैत्रीचा गंध… हे सगळं पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं, ते भारती विद्यापीठ गोडवली (2002 बॅच) च्या स्नेहसंमेलनात! तब्बल २३ वर्षांनंतर या बॅचमधील माजी विद्यार्थी पांचगणीत पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या अंगणात आनंदाचा जल्लोष रंगला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरांच्या स्वागताने झाली. त्यानंतर सर्वांनी मिळून आपल्यात नसणाऱ्या शिक्षक आणी विद्यार्थांना श्रद्धांजली अर्पण करत जुन्या सहकाऱ्यांची आठवण काढली. वातावरणात एक भावनिक ओलावा पसरला होता. त्यानंतर सर्वांच्या भाषणांनी आणि अनुभवांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.या शाळेने अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक जण आज उच्च पदावर आहेत. काही जण सेवानिवृत्त झाले आहेत. या
या विद्यार्थ्यांनी त्या वेळी त्यांना शिकविलेल्या शिक्षकांना बोलावून त्यांचा सत्कार केला. यामध्ये श्री.सावंत एस एन. ,श्री. आबदर विकास बाबुराव, श्री. सावंत व्ही. बी.
श्री.कदम हणमंत रामचंद्र एम डी कदम सर,अक्रम थोरात सर
“२३ वर्षांनी पुन्हा शाळेच्या दारी उभं राहिल्यावर असं वाटलं की काळ उलट चाललाय,” असं अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं. जुन्या आठवणींवर हशा आणि अश्रूंचं एक आगळं मिश्रण पाहायला मिळालं. मित्रांनी पुन्हा एकदा जुने फोटो पाहत, किस्से सांगत, एकमेकांना मिठ्या मारत बालपणाचे क्षण पुन्हा जगले.काहीही आपल्या शब्दातून आठवणी ना उजाळा दिला भावनिक होता.
कार्यक्रमात शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, त्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भविष्यात योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. केक कटिंग आणि सामूहिक छायाचित्रांनी या स्नेहसंमेलनाचा अविस्मरणीय शन होता. कार्यक्रम समारोप वेळी सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते — “शाळा बदलली, चेहरे थोडे बदलले, पण आपलं नातं आजही तेच आहे,” या भावनेने प्रत्येकाचं मन भारावलं.
विद्यार्थांचं एकत्र येन हे स्नेहसंमेलन म्हणजे केवळ एक भेट नव्हती, तर आयुष्यभर स्मरणात राहणारा हृदयस्पर्शी क्षण ठरला.विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकाशी संवाद साधत आनंद लुटला. याबरोबरच शिक्षकांचा सत्कार आणि शाळेला भेटवस्तू देऊन सर्व जण आपल्या विचारांची देवाणघेवाण घेत पुन्हा नवी ऊर्जा घेऊन मार्गस्थ झाले.
यावेळी माजी विद्यार्थ गणेश कासुर्डे, निलेश चौरसिया, मुक्ता कासुर्डे,सुनील बिडवई, ज्योती आंब्राळे,अर्चना बेलोशे, रेणुका कांबळे, नीलम आंब्राळे, जयश्री मालुसरे, योगेश पाटील, भूषण पाटील, तानाजी मालुसरे, नरेश वाट्टमवार, बिपीन भिलारे, विजय पाटील सचिन रांजणे प्रशांत जाधव, सचिन उंबरकर, महेश डोईफोडे माजी विद्यार्थी उपस्थित होते.

