रुग्णसेवेला माणुसकीचा हात; घोटेघर येथील महिलेच्या प्रस्तुतिकामी माणुसकी धावली..!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी — काटवली उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या घोटेघर येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी तातडीने दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक होते. मात्र रुग्णवाहिका सेवेला होणारा विलंब यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काटवली उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना दिलीप चव्हाण आणि SOS टीम पाचगणी यांनी माणुसकीचा हात पुढे केला.सुट्टीवर असताना देखील आपल्या कामत दिरंगाई न करता मदतीचा हात दिला.

परिस्थितीचे गामीभे लक्षात घेऊन त्यांनी वेळ न दवडता स्वखर्चाने रुग्णाला घोटेघर येथून पाचगणी येथे घेऊन आले. यावेळी मेढा येतील रुग्णवाहीका पाचगणी परिसरात पोहोचल्यावर त्यामध्ये रुग्णाला हलवले त्यानंतर पुढील उपचारासाठी सोमर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या या सेवाभावामुळे आई व बाळ दोघेही सुरक्षित राहिले असून स्थानिकांनी या मानवतावादी कार्याचे कौतुक केले आहे.

संकटाच्या क्षणी मदतीसाठी धावून गेलेल्या ज्योत्स्ना चव्हाण आणि SOS टीमने दाखवलेली तत्परता म्हणजे खरी “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” याचे जिवंत उदाहरण आहे. समाजापुढे त्यांनी आदर्श ठेवत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. तर या निमित्ताने पुन्हा एकदा माणुसकीचे नाते दृढ केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!