पाचगणी जवळील वर्षा व्हीला बंगला डान्सबार प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; १८ लाख ८० हजारांचे साहित्य जप्त मालकासह ६ जण ताब्यात.
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतीक दर्जाच्या पर्यटन स्थळी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली
वर्षा व्हिला, पाचगणी खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील बंगल्यावर विमला डान्सवर ६ बारबाला महिला आणुन त्यांना संगिताच्या तालावर उत्तान कपडयात विभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत प्रकार उघडकीस आल्याने पाचगणी पोलीसांची धडक कारवाई केली यामध्ये मालकसहित ६ जणांना ताब्यात घेत. १८,८०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकाराने पाचगणीमध्ये खळबळ उडाली आहे.

पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीवरून वर्षा व्हिला, पाचगणी खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील बंगल्यावर विमला डान्सवर ६ बारबाला महिला आणुन त्यांना संगिताच्या तालावर उत्तान कपडयात विभत्स हायमाय करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असल्याची खबर खास खबऱ्याकडून पोलिस स्टेशनला मिळाली होती.
प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक, वैशाली कडुकर, व उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे, वाई यांच्या निर्देशानुसार
पाचगणी पोलीस स्टेशनचे सपोनी दिलीप पवार पांचगणी पोलीस ठाणे यांनी दि. ३ नोव्हेंबर रोजी त्यांचे खास बातमीदारा मार्फत त्यांचेकडील खास खबरीदाराच्या खबरीवरून खिंगर ता. महाबळेश्वर जि. सातारा वर्षा व्हिला धडक कारवाई केली. यामध्ये सहा फौजदार कैलासनाथ रसाळ, पो. हवालदार श्रीकांत कांबळे, पो.हवालदार विठ्ठल धायगुडे, पो. कॉ. उमेश लोखंडे, व्ही. यु. नेवसे महिला पो कॉ. श्रुती गोळे यांनी घटनास्थळी धडक मोहीम राबवली.
यावेळी वर्षा व्हीला बंगल्यामध्ये गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालक यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ६ महिला आणुन त्यांना बारबाला संगिताचे तालावर उत्तान कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करून नृत्य करीत असल्याचे निर्दशनास आल्याने छापा टाकला असता सदर बंगल्याच्या मुख्य हॉलमध्ये जावून पाहीले असता ६ बारबाला आळीपाळीने येवुन उत्तान कपडयात तेथे सुमारे ५ ते ७ गि-हाईकांच्या समोर उभ्या राहुन विभत्स हावभाव करुन गिहाईकांच्या जवळ जावून त्यांचेशी लगट करीत असल्याचे दिसले, असता ५ जणीना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये बंगल्याचे मालक यांचेसह इतर
लोकांवर गुन्हा दाखल करणेत आला आहे. सदर ठिकाणाहुन साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, मोबाईल, डिव्हीजार व कार असे एकुण किंमत रूपये १८,८०,०००/- रूपये किंमतीचे साहीत्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे.
घडलेल्या प्रकाराबाबत भारतीय दंड संहिता कलम 296, 223, 355 तसेच महाराष्ट्र हॉटेल आणि मध्यपानकक्ष (बाररुम) मधिल अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 3, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप जी. पवार हे करत आहेत.
गुन्ह्याचा पुढील तपास मा.श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सो. सातारा, मा. वैशाली कड़कर अपर पोलीस अधीक्षक सो. सातारा, मा.श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप जी. पवार पांचगणी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

