महाबळेश्वरचे माजी सभापती मारुती सोनटक्के भारत भूषण अवॉर्डने सन्मानित.. दिल्ली दरबारी : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार प्रदान

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन ह्युमन राईट अँड अँटीकरप्शन ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे वतीने विविध क्षेत्रात केलेल्या मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याच्या गौरवार्थ
पाचगणी येथील महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती व गुरुकृपा कॉन्व्हेंटचे संस्थापक श्री मारुती दत्तू सोनटक्के यांचा मा. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व राज्यमंत्री मुलीधर मोहळ यांच्या हस्ते भारत भूषण अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मानवाधिकार दिनानिमित आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन ह्युमन राईट अँड अँटीकरप्शन ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे वतीने देशातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून भारत भूषण अवॉर्डने पुरस्कार सोहळा पार पडला यामध्ये केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले व प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री ( सहकार व नागरी उड्डाण मंत्री) मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती मारुती सोनटक्के यांना भारत भूषण अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सायबर क्राइम ऑफिसर पंजाबचे कृपाल सिंग, इंटरनॅशनल डायरेक्टर एक्झिक्यूटिव्ह वर्ल्ड अँटीक्राईम असोसिएशनचे अतुल विश्वास कदम, जिल्हा न्यायाधीश मुंबई, सादिक अली सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी सभापती मारुती सोनटक्के यांना मिळालेल्या भारत भूषण पुरस्काराबद्दल त्यांचे खासदार निलेश लंके, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्ली दरबारी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आहे.

चौकट : राजकीय कारकीर्दीत माजी सभापती मारुती सोनटक्के यांनी पंचायत महाबळेश्वर सभापती असताना निर्मल तालुका म्हणून राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला आहे. आज पुन्हा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याच्या निमित्ताने भारत भूषण अवॉर्ड प्राप्त केला आहे. हे त्यांच्या सामाजिक कार्याचे फलित आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!