भिलारमध्ये अभिजात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात ‘यशदा’च्या वैद्यकीय प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची काव्यरंगत; पदयात्रा व पुष्पहार अर्पणाने कार्यक्रमाची सांगता

Spread the love

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा मराठी भाषा गौरव दिन भिलार येथील ‘पुस्तकांचं गाव’ प्रकल्प कार्यालयाच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. अभिजात मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत विविध साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण प्रशासन विकास प्रबोधिनी (यशदा) येथील ४४ वैद्यकीय प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी क्षेत्रभेटीच्या निमित्ताने उपस्थिती लावली. मराठी भाषेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काव्यवाचन व कविता सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कविता सादर करणाऱ्या डॉक्टरांना प्रकल्पातर्फे उपसंचालक  मंगेश जोशी (भा.प्र.से) यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सांगता ‘महाराष्ट्र गीत’ गायनाने करण्यात आली.

यानंतर सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकल्प कार्यालयापासून जिल्हा परिषद केंद्र शाळेपर्यंत पदयात्रा काढून मराठी भाषा संवर्धनाचा संदेश दिला. केंद्रशाळेच्या प्रांगणात मा. श्री. मंगेश जोशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सांगता करण्यात आली.

याप्रसंगी यशदा सत्र-संचालिका मा. स्वाती कुलकर्णी, उप-संचालक मा. मंगेश जोशी (भा.प्र.से), सर्व वैद्यकीय अधिकारी व प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राजेश जाधव यांनी केले. कार्यक्रमाची आखणी व मांडणी बालाजी हाळदे यांनी केली, तर  उमा शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!