बोपर्डी ग्रामपंचायत बनली मुख्यमंत्री पंचायत राज आदर्श.. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रशासकीय कामाची दखल..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : बोपर्डी (ता. वाई) ग्रामपंचायतीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे सुरू असून, गाव विकासाच्या नव्या टप्प्यावर वाटचाल करत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने प्रशासकीय स्तरावरही बोपर्डीच्या कामाचे कौतुक केले जात आहे. अभियानांतर्गत वनराई बंधारे, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर…

