पाचगणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन; शहरात सुरक्षेची कडक व्यवस्था
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नगरपरिषद निवडणुक २ डिसेंबर रोजी होत आहे. यापार्श्वभूमीवर पाचगणी शहरात पोलिसांनी भव्य संचलन करत सुरक्षेची कडक तयारी दाखवली. शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, पर्यटन क्षेत्रांसह संवेदनशील प्रभागांत पथसंचलन करून पोलिसांनी सज्जतेचा संदेश दिला.

मतदारांमध्ये विश्वास वाढवण, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि कोणत्याही अनावश्यक गोंधळाला आळा घालणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
निवडणूक काळात शहरात कडक गस्त, संचलनामुळे शहरात निवडणूक वातावरणात शिस्त आणि सुरक्षिततेची भावना अधिक वाढण्यास मदत होणार आहे.

