Headlines

भ्रष्टाचाराच्या आरोपाखालीलांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत” – करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर घणाघात

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  करहर : “ज्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे कच्चे चिट्ठे न्यायालयात आहेत आणि ज्यांच्यावर थेट आरोपपत्र दाखल आहे, त्यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नयेत. मी जनतेच्या दारात जाणारा माणूस आहे, पैशाच्या दारात फिरणारा ठेकेदार नाही. माझ्या नादाला लागला तर याद राखा, मी लुंग्या-सुंग्या नाही, छत्रपतींची औलाद आहे,” अशा आक्रमक शब्दांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करहर…

Read More

“भिलार गणात ‘लाडक्या बहिणी’चा जलवा – महिला मतदारांचा सुप्रिया भिलारे यांना उत्स्फूर्त पाठिंबा”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गणातील प्रत्येक गावात भाजपच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांना मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश झाल्याने अवघ्या काही तासांतच प्रचाराला अधिकच वेग आला असून संपूर्ण परिसर निवडणूकमय झाला आहे. ‘लाडक्या बहिणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

Read More

भिलार गटात ‘घड्याळा’ची वेळ सुरू – विक्रमी मतांनी राष्ट्रवादीचा विजय निश्चित”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गटातील गटांतर्गत गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हाचा प्रचार सध्या जोमात सुरू असून, “कुणाची वेळ कुठे हवी हे मतदारांनी ठरवले आहे आणि विकासासाठी फक्त राष्ट्रवादी हाच पर्याय आहे,” असा ठाम विश्वास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जावळी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्रशेठ राजपुरे यांनी व्यक्त केला आहे. भिलार…

Read More

ओबीसीच्या आरक्षणावर लढणाऱ्या मराठा कुणबी उमेदवारांना ओबीसींनी मतदान करू नये : अध्यक्ष भरत लोकरे

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  सातारा : जावली तालुका येथील ३६ म्हसवे गटाचे अपक्ष उमेदवार श्री. संतोष दिनकर शिराळे यांच्या प्रचारार्थ करंदी, करंजोशी, नेवेकरवाडी, रानगेघर आलेवाडी, दरे, धोंडेवाडी, करहर येथे जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे, लोहार सुतार समाजाचे अध्यक्ष माधव लोहार, महाबळेश्वर ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार, लोहार-सुतार संघटनेचे कार्याध्यक्ष हनुमंत मोने, सहसचिव संतोष सपकाळ यांचा…

Read More

प्रस्थापितांना घरी बसवण्याचा विडा” : म्हसवे गटात सर्वपक्षीय महाआघाडीची ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन रॅली

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा ​करहर: म्हसवे जिल्हा परिषद गट आणि गणाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, आज सर्वपक्षीय उमेदवारांनी काढलेल्या ऐतिहासिक प्रचार रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. “प्रत्येक वेळी मीच उमेदवार” म्हणणाऱ्या प्रस्थापितांना घरी बसवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या पोराला सत्तेत बसवण्यासाठी ही निवडणूक असल्याचे जाहीर करत शिवसेनेचे (शिंदे गट) संदीप पवार यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं…

Read More

म्हसवे गटात भाजपचा विजयाचा ‘राजयोग’! शिवेंद्रराजेंची वसंतराव मानकुमरे यांच्यासाठी विकासाची साद; ‘महाडिक-पोफळे’ जोडीलाही मिळणार कौल!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  म्हसवे: “म्हसवे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि विकासाची कामे खेचून आणण्यासाठी वसंतराव मानकुमरे यांच्यासारखं धाडसी आणि अभ्यासू नेतृत्व हीच काळाची गरज आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा हा लोकप्रतिनिधी असून, म्हसवे गटाच्या विकासासाठी जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,” असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी…

Read More

भिलार गणात वंदना भिलारे यांची विजयाकडे निर्णायक वाटचाल; जनतेच्या रेट्यावर दावेदारी मजबूत

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भिलार गणामध्ये वंदना भिलारे यांची विजयाची दावेदारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे. राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, स्थानिक प्रश्नांची अचूक जाण आणि मतदारांच्या मनाची नस ओळखण्याची क्षमता यांच्या बळावर त्यांनी आपला विजय जवळजवळ दृष्टिक्षेपात आणल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात वसलेला भिलार गण हा…

Read More

भिलार गणात भाजपची पकड मजबूत; सौ. सुप्रिया भिलारे प्रचारात आघाडीवर

पाचगणी : सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या भिलार गणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गणातील प्रत्येक गावात त्यांना मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचाराला चांगलीच धार चढली आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने भिलार गट व भिलार गणामध्ये संघटनात्मक पातळीवर भक्कम बांधणी…

Read More

संघर्षातून तेजोमय प्रकाशित नेतृत्व ज्योत : उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांचा प्रवास..! सामान्यजनांचा बुलंद आवाज : उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांचा कर्तृत्वगौरव..!

कर्तृत्वाचा दाता – गोरगरिबांचा कैवारी, सामान्यजनांचा खंबीर आवाज… पाचगणी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाशगोळे म्हणजे केवळ एक लोकप्रतिनिधी नाहीत, ते म्हणजे दुःखात धावून येणारा मित्र, अडचणीत आधार देणारा भाऊ आणि आशेचा हात धरून उभा राहणारा माणूस. मैत्री जपणारा दिलदार स्वभावाचा तेजोमय प्रकाश सामान्यांच्या वेदनांना स्वतःच्या हृदयात सामावून घेणारी संवेदनशीलता जपणाऱ्या इतरांच्या आयुष्यात उजेड पसरवणाऱ्या या तेजोमय प्रकाशाचा…

Read More

खर्शी–बारामूरेत भाजप एकसंध; गोरख महाडिकांच्या विजयासाठी जीव तोडून काम करणार – श्रीहरी गोळे

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर :  म्हसवे गटांतर्गत खर्शी–बारामूरे गणातील भाजपचे अधिकृत उमेदवार गोरख महाडिक यांच्या विजयासाठी आपण स्वतः जीवाचे रान करणार असून, आपण कोठेही नाराज नसल्याची स्पष्टोक्ती माजी जावळी तालुका प्रमुख श्रीहरी गोळे यांनी पत्रकार परिषदेत केली. उमेदवारी मागे घेतल्यानंतर आपण नाराज असल्याच्या पसरलेल्या चर्चांना पूर्णविराम देत गोळे यांनी भाजपातील एकजुटीचा ठाम संदेश दिला. श्रीहरी…

Read More
error: Content is protected !!