Shristi

पाचगणीत ‘स्वच्छ उत्सव’ची हाक; नैसर्गिक रंगांनी साजरी करा पर्यावरणपूरक होळी

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले हिलदारी उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ अभियान व ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत स्वच्छ उत्सव – पर्यावरणपूरक उत्सव ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने नागरिक व पर्यटकांनी होळीचा सण नैसर्गिक व रसायनमुक्त रंगांचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. होळीच्या काळात रासायनिक रंगांच्या…

Read More

टेबललँड वरील तळ्याच्या सुशोभीकरणास प्रारंभ; ‘अमृत-२’ योजनेतून ४.६२ कोटींच काम..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : मदत व पूर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निधीतून ‘अमृत-२’ योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ४ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीतून टेबललँडवरील तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पाचगणीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे, नगरसेवक…

Read More

पाचगणीत ‘बरुचा बंगला’वर ईडीची धडक कारवाई; मनी लॉन्डरिंग प्रकरणी ; स्थानिक प्रशासनात मात्र संभ्रमाचे वातावरण

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी  : पर्यटननगरी पाचगणीत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) धडक कारवाई करत प्लॉट क्रमांक २२३ वरील ऐतिहासिक ‘बरुचा बंगला’मधील दोन-तृतीयांश अविभाजित हिस्सा आपल्या ताब्यात घेतला आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित ठिकाणी अधिकृत नोटीस चिटकविण्यात आली आहे. नोटीशीतील तपशिलांवरून कारवाईची माहिती स्पष्ट झाली आहे. या घटनेमुळे…

Read More

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास; न्यायालयाचा कडक निर्णय

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  पाचगणी (ता. महाबळेश्वर) – अल्पवयीन मुलीवर घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व रुपये १५ हजार दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल वाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला. याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार  दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक…

Read More

पाचगणी नगरपरिषद नगराध्यक्ष केबिनचे नूतनीकरण; वाढीव सदस्यसंख्येमुळे आसनव्यवस्थेची समस्या दूर

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर नव्याने वाढ झालेल्या प्रभाग रचनेमुळे नगरपरिषदेतील सदस्यसंख्या वाढली असून, त्यानुसार नगराध्यक्ष केबिनमधील आसनव्यवस्था अपुरी पडत होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष केबिनचे नूतनीकरण करण्यात आले असून नव्या केबिनचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. पूर्वी पाचगणी नगरपरिषदेची सदस्यसंख्या १७ असून नगराध्यक्षासह ती १८…

Read More

सलग दुसऱ्या वर्षी राज्यात अव्वल; ‘माझी वसुंधरा ५.०’मध्ये पाचगणीचा पर्यावरणीय मानाचा तुरा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा राज्यभर आपली छाप उमटवली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित प्रतिष्ठेच्या माझी वसुंधरा ५.० अभियानात १५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपरिषद गटात पाचगणीने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी माझी वसुंधरा ४.०मध्येही पाचगणीने याच गटात अव्वल स्थान मिळवले होते. सलग दोन वर्षे…

Read More

भोसे खिंड येथे मध्यरात्रीच्या हुल्लडबाजी प्रकरणी ; पाचगणी पोलिसांकडून तात्काळ कारवाई

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भोसे, खिंड (तालुका महाबळेश्वर ) येथे पाचगणी – महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर मध्यरात्री भररस्त्यात हुल्लडबाजी करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांवर पाचगणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पाचगणी पोलिसांच्या धडक कारवाईचे कौतुक होत आहे. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री…

Read More

महाबळेश्वर तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला : सेंट झेवियर्स हायस्कूलला SQAAF अंतर्गत A+ मानांकन

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात महाबळेश्वर तालुक्यातून केवळ सेंट झेवियर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (ICSE व SSC) या शाळेनेच A+ मानांकन पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील हजारो शाळांपैकी फक्त…

Read More

पानस फाटा–पानस रस्त्यावर साईडपट्यांचा अभाव; टेम्पो थेट शेतात पलटी, बांधकाम विभागावर निष्काळजीपणाचा टेम्पो चालकास फटका..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पानस फाटा ते पानस रस्त्याचे डांबरीकरण करताना पानस फाटा ते पाटील ढाबा ३०० मीटर अंतरापर्यंतच्या साईडपट्यांचा अभाव आणि अरुंद रस्ता यामुळे आज दुपारच्या सुमारास एका टेम्पोचा अपघात झाला. रस्त्याचा योग्य अंदाज न आल्याने टेम्पो थेट शेतात पलटी झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जावळी तालुक्यातील पाचगणी–करहर…

Read More

बदलत्या शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे — ह.भ.प. संतोष महाराज भादिर्गे, यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : बदलत्या शैक्षणिक पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी काळाच्या गरजेनुसार स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक आहे. दहावीपर्यंत शिक्षकांचा धाक आणि मार्गदर्शन मिळते; मात्र त्यानंतर मुक्त शिक्षण प्रणालीत स्वतःच्या जिद्दी, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जावे लागते. त्यामुळे आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. संतोष महाराज भान्दिर्गे यांनी केले. तालुका जावळी…

Read More
error: Content is protected !!