Shristi

घाटजाई देवी यात्रेनिमित्त पांचगणी शहरात दोन दिवस वाहतूक व्यवस्थेत बदल; पोलीस प्रशासनाची अधिसूचना जारी..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : येथील श्री घाटजाई काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा दि. १० फेब्रुवारी प्रारंभ होत असून ११ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या यात्रेनिमित्त पाचगणी शहरात असंख्य भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. या कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात महायुतीत फिफ्टी–फिफ्टी सत्ता; भिलारवर राष्ट्रवादीचा गजर, तळदेववर शिंदेसेनेचा “धनुष्यबाण” चा वेध

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकांनी तालुक्याचे राजकीय चित्र स्पष्ट केले असून भिलार गट व त्याअंतर्गत भिलार आणि मेट–गुताड गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचा) जोरदार गजर घुमला आहे. तर पश्चिम विभागातील तळदेव गट तसेच तळदेव व कुंभरोशी गणांवर शिंदेसेनेने पूर्णतः धनुष्यबाणाचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदेसेना या…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्राथमिक अंदाजानुसार ७६ टक्के मतदान: २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद भिलार, व तळदेव, गटासाठी गटांतर्गत चार गणांत भिलार, मेट – गुताड,  तळदेव, कुंभरोशी, मतदान प्रक्रियेत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ तर पंचायत समितीच्या १५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होऊन अंदाजे ७६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आहे. भिलार गट आणि गटांतर्गत भिलार आणि मेट…

Read More

महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज 

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ अनुषंगाने महाबळेश्वर तालुक्यात दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही मतदान प्रक्रिया सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत शांततामय व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून प्रशासनाने त्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी भिलार व…

Read More

स्वच्छ शहरासाठी झटणाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित तरच समाज निरोगी” – पाचगणीत ‘प्रोजेक्ट सेफ’ अंतर्गत स्वच्छतादूतांना विशेष गणवेश वाटप

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे स्वच्छतादूत हे समाजाचे खरे आरोग्यरक्षक आहेत. त्यांच्या श्रमामुळे नागरिकांचे आरोग्य निरोगी राहते. मात्र या स्वच्छतादूतांचे आरोग्य व सुरक्षितता जपली गेली, तरच समाज खऱ्या अर्थाने निरोगी होईल, असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या डॉ. मंजूताई हुंडेकर यांनी केले. पाचगणी नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महर्षी…

Read More

“माझी लढाई विठ्ठलाशी नाही, बडव्यांशी आहे” – शशिकांत शिंदेंची अप्रत्यक्ष टीका;  करहरमध्ये राष्ट्रवादीची जोरदार सांगता सभा

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : “माझी लढाई विठ्ठलाशी नाही, तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे” अशा शब्दांत शिवेंद्रराजे समर्थकांवर यांचे नाव न घेता  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी अप्रत्यक्ष शाब्दिक घणाघात केला. करहर (ता. जावळी) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखेरच्या प्रचार सांगता सभेत ते बोलत होते….

Read More

भ्रष्टाचाराच्या आरोपाखालीलांनी नैतिकतेचे धडे देऊ नयेत” – करहरमध्ये शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर घणाघात

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  करहर : “ज्यांच्या भ्रष्ट व्यवहारांचे कच्चे चिट्ठे न्यायालयात आहेत आणि ज्यांच्यावर थेट आरोपपत्र दाखल आहे, त्यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नयेत. मी जनतेच्या दारात जाणारा माणूस आहे, पैशाच्या दारात फिरणारा ठेकेदार नाही. माझ्या नादाला लागला तर याद राखा, मी लुंग्या-सुंग्या नाही, छत्रपतींची औलाद आहे,” अशा आक्रमक शब्दांत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करहर…

Read More

“भिलार गणात ‘लाडक्या बहिणी’चा जलवा – महिला मतदारांचा सुप्रिया भिलारे यांना उत्स्फूर्त पाठिंबा”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गणातील प्रत्येक गावात भाजपच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांना मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश झाल्याने अवघ्या काही तासांतच प्रचाराला अधिकच वेग आला असून संपूर्ण परिसर निवडणूकमय झाला आहे. ‘लाडक्या बहिणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

Read More

भिलार गटात ‘घड्याळा’ची वेळ सुरू – विक्रमी मतांनी राष्ट्रवादीचा विजय निश्चित”

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गटातील गटांतर्गत गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हाचा प्रचार सध्या जोमात सुरू असून, “कुणाची वेळ कुठे हवी हे मतदारांनी ठरवले आहे आणि विकासासाठी फक्त राष्ट्रवादी हाच पर्याय आहे,” असा ठाम विश्वास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जावळी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्रशेठ राजपुरे यांनी व्यक्त केला आहे. भिलार…

Read More

ओबीसीच्या आरक्षणावर लढणाऱ्या मराठा कुणबी उमेदवारांना ओबीसींनी मतदान करू नये : अध्यक्ष भरत लोकरे

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा  सातारा : जावली तालुका येथील ३६ म्हसवे गटाचे अपक्ष उमेदवार श्री. संतोष दिनकर शिराळे यांच्या प्रचारार्थ करंदी, करंजोशी, नेवेकरवाडी, रानगेघर आलेवाडी, दरे, धोंडेवाडी, करहर येथे जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे, लोहार सुतार समाजाचे अध्यक्ष माधव लोहार, महाबळेश्वर ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार, लोहार-सुतार संघटनेचे कार्याध्यक्ष हनुमंत मोने, सहसचिव संतोष सपकाळ यांचा…

Read More
error: Content is protected !!