Category: Politics
स्ट्रॉबेरीच्या शेतातच प्रचार; वंदनाताई भिलारे यांचा मतदारांशी थेट संवाद”
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गटांतर्गत भिलार गणातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदनाताई भिलारे यांनी ऐन निवडणूक काळात प्रचाराची एक वेगळी आणि लक्षवेधी नीती अवलंबली आहे. पारंपरिक सभा-मेळाव्यांपेक्षा थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत त्यांनी चक्क स्ट्रॉबेरी शेतीची वाट धरली आहे. शेतात राबणाऱ्या स्ट्रॉबेरी उत्पादक मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती…
पूनमताईने प्रचारात उठवलंय रान जनामनात “धनुष्यबाण” प्रतिष्ठेच्या भिलार गणात शिवसेनेच्या विजयाची हीच खरी नांदी..!
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गणातील यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असून या गणात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या रणांगणात शिंदेसेनेच्या उमेदवार पूनमताई कांबळे–गोळे यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकत आघाडी घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावोगावी सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, जनतेकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादामुळे त्यांच्या विजयाचा गुलाल…
“पुस्तकांचे गाव’ ही भिलारची ओळख भाजपने दिली; भिलारचा विकास टिकवायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही – ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले..! निधीचा मलिदा तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांना या निवडणुकीत हद्दपार करा : अशी घणाघाती टीका डी. एम. बावळेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली..
निधीचा मलिदा तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांना या निवडणुकीत हद्दपार करा : अशी घणाघाती टीका डी. एम. बावळेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.. गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार गावाला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून जागतिक ओळख मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य भारतीय जनता पक्षानेच केले असून, या ओळखीबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास कायम राखायचा असेल, तर भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे…
महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; भिलारमध्ये महायुतीतच संघर्ष, तळदेव–कुंभरोशीत बहुरंगी लढती
पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांतील निवडणूक चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर सर्वच गट-गणांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार असून उद्यापासून प्रचाराची खरी रणधुमाळी सुरू होणार आहे. तालुक्यावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपली सत्ता कायम राखणार की शिंदे…
अर्ज माघारीनंतर महाबळेश्वर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी; २१ उमेदवार रिंगणात, तळदेव गणात चौरंगी कुंभरोशीमध्ये पंचरंगी लढती ; भिलार गटात महायुतीत रंगणार सामना..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १७ उमेदवारांनी आपले २९ उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने आता एकूण २१ उमेदवार अंतिम रिंगणात उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असून तळदेव मध्ये चौरंगी तर कुंभरोशीत पंचरंगी…
“निष्ठेची मशाल हाती घेऊन मिलिंद नलावडे रिंगणात; म्हसवे गटात ठाकरे सेनेचा विजयाचा निर्धार” “आता नाही तर कधीच नाही! म्हसवे गटात निष्ठावंतांचा एल्गार, मिलिंद नलावडेंना जनतेचा उस्फूर्त पाठिंबा”
“आता नाही तर कधीच नाही! म्हसवे गटात निष्ठावंतांचा एल्गार, मिलिंद नलावडेंना जनतेचा उस्फूर्त पाठिंबा” गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यातील प्रतिष्ठेच्या म्हसवे गटाची निवडणूक यावेळी केवळ राजकीय स्पर्धा न राहता, निष्ठा, विश्वास आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची लढाई बनली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी, खर्शी गण आणि म्हसवे गटात सामान्य…
कौसल्या भिलारेंच्या भिलार गणातील उमेदवारीने ट्विस्ट वाढला..अपक्ष उमेदवारीवरून संभ्रम; २७ तारखेपर्यंत उत्सुकता शिगेला
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या भिलार गणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून कौशल्या भिलारे यांच्या अपक्ष उमेदवारीने भिलार गणात राजकीय वर्चस्वाच्या लढाईत पाठिंबा वाढत आहे. शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख संभाजी भिलारे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली…
महाबळेश्वर तालुक्यात भाजपला मोठे बळ; विविध पक्षांतील पदाधिकारी व ग्रामस्थांचा जाहीर प्रवेश
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत. विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ भाजपमध्ये सामील होत असल्याने तालुक्यात भाजपचे संघटनात्मक बळ लक्षणीयरीत्या वाढले आहे. या घडामोडींचा थेट फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये…
माघी गणेश जयंती उत्सवाच्या मुहूर्तावर विठ्ठल गोळेंच्या प्रचाराचा श्रीगणेशा; आमदार शशिकांत शिंदेंनी घेतले गणेशाचे दर्शन
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जावळी तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची जोरदार धावपळ सुरू आहे. अशा ऐन निवडणूक रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी माघी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने रुईघर (गणेशपेठ) येथील प्रसिद्ध गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. याच शुभमुहूर्तावर खर्शी–बारामुरे गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल गोळे यांच्या प्रचाराचा औपचारिक…
लोकशाहीला साथ, विकासाला मत’चा नारा देत सुशील गोळेंचा उमेदवारी अर्ज दाखल; खर्शी–बारामुरे गणात उत्साहाचे वातावरण
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, युवकांच्या प्रश्नांची अचूक जाण आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क असलेले धडाडीचे युवा नेते श्री. सुशील विष्णू गोळे यांनी आज खर्शी–बारामुरे गण पंचायत समिती निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत ‘लोकशाहीला साथ, विकासाला मत’ असा नारा देत परिसर दणाणून सोडला. सुशील…

