कौसल्या भिलारेंच्या भिलार गणातील उमेदवारीने ट्विस्ट वाढला..अपक्ष उमेदवारीवरून संभ्रम; २७ तारखेपर्यंत उत्सुकता शिगेला

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या भिलार गणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून कौशल्या भिलारे यांच्या अपक्ष उमेदवारीने भिलार गणात राजकीय वर्चस्वाच्या लढाईत पाठिंबा वाढत आहे.

शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख संभाजी भिलारे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे भिलार परिसरात त्यांचा दांडगा लोकसंपर्क निर्माण झाला असून, अनेक विकासकामांना गती मिळाली आहे.

या सामाजिक कार्याच्याच बळावर संभाजी भिलारे यांनी आपल्या पत्नी कौसल्या संभाजी भिलारे यांना भिलार गणातून (अपक्ष) म्हणून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. कौसल्या भिलारे या नव्या चेहऱ्याच्या रूपात जनतेसमोर आल्या असल्या, तरी त्यांना पतीच्या सामाजिक कार्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुकाप्रमुख म्हणून संभाजी भिलारे यांनी विविध समाजोपयोगी उपक्रम, शैक्षणिक सुविधा, डिजिटल उपक्रम आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल जनतेत घेतली जाते.

दरम्यान, भिलार गणात शिंदेंच्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुखानी आपल्या पत्नी कौसल्या भिलारेना निवडणूक रिंगणात उतरविल्याने मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला आहे पक्षाच्या अंतिम यादीत नेमके कोणाचे नाव राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, यासाठी २७ तारखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या घडामोडींमुळे भिलार गणातील लढत अधिकच रंजक बनली आहे.

महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, तालुकाप्रमुख संभाजी भिलारे आपल्या पत्नी कौसल्या भिलारे यांची उमेदवारी मागे घेणार का? जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही, तर भिलार गणात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत शिवसेनेच्या जिल्हास्तरीय वरिष्ठ नेत्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. त्यांच्या निर्णयावरच या गणातील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सध्या भिलार गणात इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, येत्या काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडी या निवडणुकीची दिशा ठरवणाऱ्या ठरणार आहेत. भिलार गणातील ही लढत केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर तालुकास्तरावरही राजकीय चर्चेचा विषय बनली आह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!