Category: Politics
प्रस्थापितांना घरी बसवण्याचा विडा” : म्हसवे गटात सर्वपक्षीय महाआघाडीची ऐतिहासिक शक्तीप्रदर्शन रॅली
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर: म्हसवे जिल्हा परिषद गट आणि गणाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, आज सर्वपक्षीय उमेदवारांनी काढलेल्या ऐतिहासिक प्रचार रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. “प्रत्येक वेळी मीच उमेदवार” म्हणणाऱ्या प्रस्थापितांना घरी बसवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या पोराला सत्तेत बसवण्यासाठी ही निवडणूक असल्याचे जाहीर करत शिवसेनेचे (शिंदे गट) संदीप पवार यांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलं…
भिलार गणात वंदना भिलारे यांची विजयाकडे निर्णायक वाटचाल; जनतेच्या रेट्यावर दावेदारी मजबूत
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : जनतेच्या विश्वासाच्या जोरावर भिलार गणामध्ये वंदना भिलारे यांची विजयाची दावेदारी दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे. राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, स्थानिक प्रश्नांची अचूक जाण आणि मतदारांच्या मनाची नस ओळखण्याची क्षमता यांच्या बळावर त्यांनी आपला विजय जवळजवळ दृष्टिक्षेपात आणल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. तालुक्याच्या पूर्व भागात वसलेला भिलार गण हा…
भिलार गणात भाजपची पकड मजबूत; सौ. सुप्रिया भिलारे प्रचारात आघाडीवर
पाचगणी : सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या भिलार गणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गणातील प्रत्येक गावात त्यांना मतदारांचा, विशेषतः महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचाराला चांगलीच धार चढली आहे. गेल्या पाच वर्षांत भाजपने भिलार गट व भिलार गणामध्ये संघटनात्मक पातळीवर भक्कम बांधणी…
खर्शी–बारामूरेत भाजप एकसंध; गोरख महाडिकांच्या विजयासाठी जीव तोडून काम करणार – श्रीहरी गोळे
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : म्हसवे गटांतर्गत खर्शी–बारामूरे गणातील भाजपचे अधिकृत उमेदवार गोरख महाडिक यांच्या विजयासाठी आपण स्वतः जीवाचे रान करणार असून, आपण कोठेही नाराज नसल्याची स्पष्टोक्ती माजी जावळी तालुका प्रमुख श्रीहरी गोळे यांनी पत्रकार परिषदेत केली. उमेदवारी मागे घेतल्यानंतर आपण नाराज असल्याच्या पसरलेल्या चर्चांना पूर्णविराम देत गोळे यांनी भाजपातील एकजुटीचा ठाम संदेश दिला. श्रीहरी…
भिलार गण निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी; सुप्रिया भिलारे ठरतात केंद्रबिंदू
मजबूत संघटन, नेत्यांची फळी आणि कार्यकर्त्यांची ताकद; भाजपचा विजय निश्चित..? गिरीस्तान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गण सध्या निवडणूक रणधुमाळीमुळे जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय जनता पक्षाने या गणात आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून निवडणूक अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी महाबळेश्वर तालुक्याकडे जातीने लक्ष दिले असून,…
म्हसवे गटात भाजपचा प्रचार शिगेला; ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे ना. शिवेंद्रसिंह राजे भासले यांचे आवाहन
‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपचे आवाहन; विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसवे गटात प्रचाराची रणधुमाळी चांगलीच तापली असून भारतीय जनता पार्टीने प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. म्हसवे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री. वसंतराव मानकुमरे (भाऊ) तसेच म्हसवे पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. रेश्मा समाधान पोपळे…
भिलार गट–गणात राष्ट्रवादीची वज्रमूठ; प्रचाराच्या रणधुमाळीत केळगणे–भिलारे–चोरमले यांची विजयी मुसंडी
राजपुरे–भिलारे नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य; विजयाचा गुलाल उधळण्याचीच प्रतीक्षा गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील सत्तेचे केंद्रस्थान मानल्या जाणाऱ्या भिलार गट व गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या सक्षम नेतृत्वात आणि जिल्हा नियोजन समितीचे समन्वयक प्रवीण भिलारे यांच्या…
म्हसवे गटात प्रचाराचा जोर वाढला; शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली संदीप पवार–विठ्ठल गोळे,शिल्पा शिंदे आघाडीवर
म्हसवे गटात प्रचाराचा धुरळा; पवार–गोळे,शिंदे, यांनी रण पेटवले घरभेटींना उस्फूर्त प्रतिसाद, विरोधकांची चिंता वाढली गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चांगलीच रंगली असून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. या गटातून शिंदेसेनेचे उमेदवार संदीप पवार तर खर्शी–बारामूरे…
म्हसवे गटात ‘प्रस्थापितां’ विरोधात सर्वसामान्यांचा एल्गार; संतोष शिराळेंच्या पाठीशी धरणग्रस्तांची वज्रमूठ
पैसा विरुद्ध निष्ठा : म्हसवे गटात संतोष शिराळेंमुळे राजकीय समीकरणे उलथापालथ गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जावळी तालुक्यातील म्हसवे जिल्हा परिषद गटाची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. भारतीय जनता पक्षाने या गटात उमेदवारी देताना मूळ ओबीसी निष्ठावंतांना डावलून धनशक्तीला महत्त्व दिल्याचा आरोप होत असतानाच, आता या लढाईला ‘सर्वसामान्यांचा आवाज’ विरुद्ध ‘प्रस्थापित’ असे…
जनसामान्यांचा आवाज म्हणून गोरखनाथ महाडिक मैदानात; खर्शी–बारामुरे गणात अभूतपूर्व जनसमर्थन”
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच जावळीचे नेतृत्व वसंतराव मानकुमरे यांचे खंदे समर्थक आणि खर्शी–बारामुरे गणातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोरखनाथ महाडिक हे जनसामान्यांचा आवाज म्हणून ही निवडणूक लढवत असून, युवा आयडॉल म्हणून त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याची ओळख, साधी राहणी आणि थेट जनतेशी संवाद हीच…

