ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये आर्ट, क्राफ्ट व सायन्स प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : येथील ग्रीन व्हॅली स्कूल मध्ये आर्ट, क्राफ्ट आणि सायन्स विषयांवरील आकर्षक प्रदर्शन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, संशोधनवृत्ती आणि कलागुणांचा संगम या प्रदर्शनातून पाहायला मिळाला.

प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दिपक कांबळे आणि पालक प्रतिनिधी श्री. सचिन चोरगे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रकल्पांमध्ये विविध प्रयोग, पर्यावरणपूरक संकल्पना तसेच दैनंदिन जीवनाशी निगडित बनविलेल्या वस्तू मांडण्यात आली होती. आर्ट व क्राफ्ट विभागात विद्यार्थ्यांच्या हातून निर्माण झालेल्या कलाकुसर  झलक या निमित्ताने पाहायला मिळाली. हस्तकला, चित्रकला, पुनर्वापर साहित्यापासून तयार केलेल्या वस्तू यांना पालकांनी विशेष दाद दिली.

 

प्रदर्शन पाहून पालकांनी समाधान व्यक्त करत सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, सृजनशीलतेला वाव मिळतो तर प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण अधिक परिणामकारक होते, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!