स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानात काटवली आरोग्य उपकेंद्र येथे महिलांच्या विविध तपासण्या आणि जनजागृती
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा
पाचगणी : प्राथमिक आरोग्य उपकेंद्र काटवली येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार विशेष अभियान’चा उपक्रम १७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो २ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून काटवली गावात विविध आरोग्यविषयक तपासण्या आणि जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात आज झालेल्या शिबिरात महिलांची तपासणी, बीपी व शुगर तपासणी, वजन व उंची मोजमाप, गरोदर माता व लहान मुलांचे आरोग्य परीक्षण तसेच मुलांचे लसीकरण करण्यात आले. किशोरवयीन मुलींसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन, महिलांची कॅन्सर तपासणी, तसेच टीबीविषयक जनजागृती करण्यात आली.
याप्रसंगी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र काटवलीच्या समुदाय आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना चव्हाण , काटवलीच्या सरपंच मिनाक्षी बेलोशे, आरोग्य सेविका भारती चौरे, आरोग्य सेवक बी एस कडलग, गट प्रवर्तक सुनीता परामने, आशा सेविका सीमा पाटील, सारिका रांजणे , प्रेरिका सुनीता बेलोशे , ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका संगीता सुतार , मदतनीस दीपाली गोळे व ग्रामस्थ महिला उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत , सव॔ महिलांची,व किशोरवयीन मुलींची,स्तनदा माता,गरोदर महिला,याची आरोग्य तपासणी करण्यात आल्याने या अभियानामुळे गावातील महिला, किशोरवयीन मुली व गरोदर मातांमध्ये आरोग्याविषयी सजगता निर्माण होत असून आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सोबत फोटो आहेत.
काटवली : महिलांचे आरोग्य तपासणी करताना आरोग्य अधिकारी

