माजी नगरसेविका निलम जवळ यांनी निवडणूक लढावी याकरिता सर्वसामान्य नागरिकांची आर्तहाक; मेढा नगराध्यक्ष पदाकरिता त्यांच्या नावाला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची साद.
मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण (सर्वसाधारण महिला) जाहीर होताच पुन्हा एकदा सामान्य नागरिकांनी एका चेहऱ्याला प्रथम पसंती दिल्याचे निदर्शनास येत आहे. तर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते साद घालत आहेत. हा चेहरा कोण असे अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र ज्या चेहऱ्याने मागील पंचवार्षिक मध्ये नगरसेविका म्हणून लोकाभिमुख कामे केल्यानेच माजी नगरसेविका निलम जवळ हे नाव…

