म्हसवे गटात भाजपचा प्रचार शिगेला; ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे ना. शिवेंद्रसिंह राजे भासले यांचे आवाहन

Spread the love

‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपचे आवाहन; विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा करहर : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हसवे गटात प्रचाराची रणधुमाळी चांगलीच तापली असून भारतीय जनता पार्टीने प्रचाराचा झंझावात उभा केला आहे. म्हसवे जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री. वसंतराव मानकुमरे (भाऊ) तसेच म्हसवे पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ. रेश्मा समाधान पोपळे यांच्या प्रचारार्थ करहर परिसरात जोरदार कोपरा सभा घेण्यात आली. या सभेत भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मतदारांना करण्यात आले.

या कोपरा सभेत भाजप नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासात्मक योजनांचा आढावा घेत, या योजनांचा थेट लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भाजपने केल्याचे ठामपणे मांडले. म्हसवे गटाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज असून ती गरज भाजपचे उमेदवार पूर्ण करतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, माजी सभापती तानाजी शिर्के, अरुणाताई शिर्के, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सयाजी शिंदे, मंडल अध्यक्ष संदीप परामणे, माजी तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, रविंद्र परामणे, हिंदुराव तरडे, समाधान पोपळे, मारुती आप्पा शिर्के, अजय शिर्के, अनिल शिर्के, अजित इंदलकर, प्रमोद शिंदे यांच्यासह म्हसवे जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते, परिसरातील विविध गावांतील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत वक्त्यांनी मतदारांना स्पष्ट आवाहन करताना सांगितले की, “आपली निशाणी कमळ” असून मतदानाच्या दिवशी “कमळ” या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. एकूणच या कोपरा सभेमुळे म्हसवे गटात भाजपच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता भाजपची आघाडी स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!