पांचगणी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : प्रजासत्ताक दिनी १२ लाखांचे ३० गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पांचगणी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या नागरिकांचे तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले होते. या पार्श्वभूमीवर गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांनुसार पांचगणी पोलीस ठाण्याच्या सायबर विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ मोबाईलचा सखोल तपास हाती घेतला. पोलिसांनी आपल्या…

