गिरीस्थान टाईम्स

गिरीस्थान टाईम्स

पर्यावरण पूरक दीपावलीकरिता हिलरेंज विद्यार्थ्यांनी साकारले आकाशकंदील; नैसर्गिक स्तोत्रांचा सुयोग्य वापर…

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार , तालुका महाबळेश्वर येथील हिलरेंज माध्यमिक विद्यालयाच्या वतीने पर्यावरण पूरक आकाश कंदील बनविण्याचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कौशल्याने शेकडो आकाश कंदील तयार केले. दीपावली काही दिवसांवर आली असल्याने आकाश कंदील व इतर साहित्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे. दिवाळी सनानिमित्त घराघरात मुख्य असतो तो म्हणजे आकाश कंदील…

Read More

जावळीला पर्यटन तालुका जाहीर करून महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट करावे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनातून मागणी..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : निसर्गसंपदेने नटलेल्या जावळी तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. याचा विचार करून जावळी पर्यटन तालुका म्हणून जाहीर करून महाबळेश्वर प्रकल्पात समाविष्ट करावा असा आशयाचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांना आ. शशिकांतजी शिंदे पर्यटन सेवा सह संस्था महू, यांच्या वतीने देण्यात आले. हे निवेदन देताना आ.शशिकांतजी शिंदे पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सुशिल…

Read More

रोजगारक्षम कोर्समधून उद्याचे नवे तंत्रज्ञ घडतील;  अमर बिरामने. पाचगणी आय टी आय मध्ये अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू..

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  युवकांमध्ये उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याच माध्यमातून महाराष्ट्र शासनाने अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केला आहे. हे कोर्स पाचगणी ITI मध्ये उपलब्ध झाले आहेत. यामधून उद्याचे नवे तंत्रज्ञ घडतील. याकरिता जावळी – महाबळेश्वर तालुक्यातील युवकांनी नवीन कोर्सेसचा   लाभ घ्यावा. असे…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज अनावरण सोहळा नेत्रदीपक रोषणाई व शिवमय जयघोषात संपन्न..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोकार्पण पारंपारिक वाद्यांच्या गजरात, नेत्रदीपक आकर्षक विद्युत रोषणाई आणि भगवी वस्त्रांकित सजावट, कोनशिला अनावरण सोहळा शिव गर्जनांच्या जयघोषात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. पाचगणी, (ता. – महाबळेश्वर ) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौथरा अनावरण…

Read More

भिलारमध्ये ११० कुणबी दाखल्यांचे वाटप; नागरिकांत समाधानाचे वातावरण

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : भिलार, तालुका महाबळेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात भिलार सह परिसरातील नागरिकांना कुणबी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात भिलारमधील १५ नागरिकांना, उंबरीतील १८ नागरिकांना, तर भोसे येथील ५ नागरिकांना कुणबी दाखले वितरीत करण्यात आले. तालुक्यातील सर्वाधिक दाखले भिलार गावातच वाटप झाले असून आजपर्यंत येथे एकूण ११० कुणबी दाखल्यांचे वितरण पूर्ण झाले…

Read More

माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठ स्पीकरपदी निवड… नवी दिल्ली येथे परिषदेला संबोधित करणार..

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे नगरपरिषदेतील स्वच्छतेतील उत्कृष्ट काम आणि लिडरशिप अंगीकृत नेतृत्वगुण याची दखल घेऊन त्यांची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नवी दिल्ली येथील ARISE सिटीज फोरममध्ये या परिषद करिता त्यांची स्पीकर म्हणून निवड झाली आहे. त्या या परिषदेला संबोधित करणार आहेत. तर यानिमित्ताने पाचगणीला आवाज आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंजणार आहे….

Read More

पसरणी घाटातील दत्त मंदिराजवळील खड्डा देतोय अपघातांना निमंत्रण; खड्डा भरण्याचे वाहनधारकांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला साकडे,

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सुरुर- पोलादपूर मार्गावर पाचगणी – वाई या मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात दत्त मंदिराजवळ मध्य रस्त्यात पडलेला खड्डा वाहनधारकांना जीवघेणा ठरत असून अपघातांना निमंत्रण देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कानाडोळा वृत्तीला मात्र वाहनचालकांकडून खड्डा भरण्याचे साकडे घातले जातेय. पाचगणी – वाई दरम्यान पसरणी घाटात दत्त मंदिरासमोर मुख्य रस्त्यावर मध्यभागी खड्डा पडला…

Read More

पाचगणीचा कारभारी आज ठरणार तर ; प्रभाग आरक्षण ८ ऑक्टोबर बुधवारी..!

गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक प्रक्रियांनी वेग घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाचगणी नगरपरिषदेच्या प्रभाग रचना अंतिम होऊन आता प्रभाग निहाय आरक्षण सोडत बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर पालिका सभागृहात निघणार असल्याची माहिती प्रशासन अधिकारी तथा मुख्याधिकारी पंडीत पाटील यांनी दिली आहे.. पाचगणी नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला असून आज नगराध्यक्ष…

Read More

वाळंजवाडी येथे स्वच्छता हीच सेवा अंतर्गत ग्राम स्वच्छता मोहीम..वृद्धांपासून ते युवकांपर्यंत सर्वांची हाती झाडू…!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : २ ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. स्वच्छ भारत निर्माण करण्याच्या संकल्पाला बळ दिले. याच अनुषंगाने वाळंजवाडी, तालुका – जावळी गावाने श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी वृद्धांपासून ते युवकांपर्यंत सर्वांची हाती झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली..   वाळंजवाडी,…

Read More

बोपर्डीकरांना ग्रामविकासाचा फिव्हर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात घेतली आघाडी

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : बोपर्डी, तालुका वाई ग्रामपंचायतीने शासनाच्या आदेशानंतर अवघ्या काही दिवसांत नियोजनपूर्वक आखणी करून बोपर्डी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी कंबर कसली आहे. तालुक्यात अग्रेसर राहण्यासाठी बोपर्डीकर गाव एकवटला असून सक्रिय योगदान देत आहे. दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर ‘ओटी मातृवाची’ पा उपक्रमातून महिलांनी मोठ्या…

Read More
error: Content is protected !!