महिला दिनानिमित्त विशेष लेख जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाचा प्रवास – डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे
“आज रास्ता बना लिया है, तो कल मंजिल भी मिल जाएगी,
हौसलों भरी यह कोशिश एक दिन जरूर कामयाबी लाएगी.”
या ओळी ज्या व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा सार सांगतात, त्या म्हणजे भिलार या “पुस्तकांच्या गावातील” कर्तृत्ववान, ध्येयवेड्या आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात सातत्याने कार्य करत त्यांनी समाजात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. जिद्द, आत्मविश्वास, कल्पकता आणि समाजाबद्दलची तळमळ या गुणांच्या बळावर त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
सासरे स्व. बाळासाहेब भिलारे (दादा) यांच्या पश्चात हिलरेंज एज्युकेशन सोसायटीची सूत्र हाती घेवून डॉ. तेजस्विनी भिलारे यांनी या संकुलनाला वेगळ्या उंचीवर नेले.

स्व.बाळासाहेब भिलारे( दादा) , सासू निर्मल ताई पती जतीन ,दीर नितीनदादा, थोरल्या जाऊ बाई तेजस्विनी यांचा खंबीर पाठिंबा घेऊन सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
भिलारमधील हिलरेंज एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या संचालिका म्हणून त्यांनी संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळत तिला नवी दिशा दिली आहे. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे नव्हे, तर त्यांना जीवनासाठी सक्षम बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम राबवत त्यांनी संस्थेला प्रगतीच्या उंच शिखरावर नेले आहे.
शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणे, महिलांच्या समस्या समजून घेत त्यांना आधार देणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजजागृती करणे अशा अनेक कार्यातून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला आहे. विधवा महिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.
घर, कुटुंब, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक कार्य या सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. त्यांच्या कार्यामागे असलेली जिद्द, ध्येयवेड आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ यामुळेच त्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.
महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा गौरव करताना डॉ. तेजस्विनी भिलारे यांचे कार्य हे खऱ्या अर्थाने प्रेरणेचे दीपस्तंभ आहे. त्यांच्या कार्यातून अनेक महिलांना समाजात पुढे येण्याची प्रेरणा मिळत आहे. शिक्षण, समाजसेवा आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रात त्यांनी उमटवलेला ठसा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
महिला सक्षमीकरण, समाजकार्य आणि नेतृत्व याबाबत केवळ विचार मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. तेजस्विनी जतीन भिलारे. नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी
राष्ट्रवादी कांग्रेसच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेत पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी परिश्रम घेतले.
समाजातील महिलांनी केवळ राजकारणात सहभागी व्हावेच नव्हे, तर नेतृत्वाची जबाबदारीही सक्षमपणे पार पाडावी, हा त्यांचा ठाम विचार आहे. या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत ना . मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे आणि नितीनदादा भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निवडणूक प्रक्रियेत लोकांशी संवाद साधत पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे “विचार फक्त बोलण्यात नाही, तर कृतीतून सिद्ध व्हावेत” हे त्यांच्या कार्यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
संघर्षातून उभी राहे, स्वप्नांना देई आकार,
शिक्षण-समाजकार्यात तिचा तेजस्वी दरबार।
नारीशक्तीच्या जागृतीचा उजळवी ती दीप भारी,
भिलारची अभिमान
तेजस्विनी भिलारे नारी॥
अश्या या तेजस्वीनी कर्तृत्ववाला येत्या काळात विविध क्षेत्रात ,साजेसे पद मिळावे ही महीला दिनानिमित्त शुभेच्छा

