गार्डन पंपहाऊस येथील पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर; पाचगणीत उद्या शनिवारी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी यांच्या मार्फत शहर व परिसरात करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाणी पुरवठा कार्यालय परिसरातील गार्डन पंपहाऊस येथे ३०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनवरील गळती काढण्याचे तसेच नवीन पाईपलाईन जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

सदर काम रात्री उशिरापर्यंत अथवा पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली. या दुरुस्तीमुळे (उद्या) शनिवार रोजीचा पाणीपुरवठा काही भागांत विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जीवन राधिकरणाच्या वतीने  करण्यात आले आहे.

नळ कनेक्शनधारक ग्राहक तसेच नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती सहाय्यक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पाचगणी यांनी केली आहे. दरम्यान, अचानक निर्माण झालेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, काम लवकरात लवकर पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!