पाचगणीत स्वामी समर्थ दुर्गाष्टमी उत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल.. आ
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : नवरात्रोत्सवानिमित्त पाचगणीत श्री स्वामी समर्थ दुर्गाष्टमी उत्सव मंडळ, बेबी पॉईंट यांच्या मार्फत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मंदिरे, देवस्थान तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने देवीची आराधना, कीर्तन, भजन, जागरण, गोंधळ तसेच देवीपूजेचे सोहळे पार पडत आहेत. या सर्व धार्मिक वातावरणामुळे शहरात भक्तीमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि योगदान लक्षात घेऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. विशेष मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.स्थानिक भजन मंडळे व गायकांच्या सहभागाने ही स्पर्धा अधिक रंगतदार झालीह. भक्तीमय गीते, अभंग आणि कीर्तनांच्या स्वरांनी वातावरण भारावून गेले आहे. स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. मुलांपासून ते महिलांपर्यंत सर्वांसाठी ही स्पर्धा खुली असून भारतीय पारंपरिक पोशाखातील सहभागींना आपली कला आणि संस्कृती दाखवण्याची संधी मिळणार आहे. विविध वयोगटानुसार पारितोषिके दिली जाणार आहेत.
श्री स्वामी समर्थ दुर्गाष्टमी उत्सव मंडळ, बेबी पॉईंट यांच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. या सर्व उपक्रमांमुळे पाचगणीतील दुर्गाष्टमी उत्सव केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक ऐक्य वृद्धिंगत करणारा ठरणार आहे.
मंडळाच्या वतीने दररोज सकाळी व सायंकाळी आरतीसोबत सामूहिक देवीपूजा केली जात आहे. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, बालकांसाठी स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
देवीच्या सभोवताली विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली असून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. पंचक्रोशीतील भाविकांसह पर्यटक देखील या कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत.

