आपला हक्काचा माणूस मैदानात!” – खर्शी-बारामुरे गणातून विठ्ठल गोळे यांना उमेदवारीसाठी जनआग्रह..!
“वीस वर्षांच्या निःस्वार्थ समाजकार्यास जनतेची सलामी; पंचायत समितीसाठी गोळेंच्या नावाची जोरदार चर्चा..!
शशिकांत शिंदेंचे विश्वासू शिलेदार विठ्ठल गोळे यांना उमेदवारी द्यावी; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सूर
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी / : जावळी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील खर्शी–बारामुरे गणात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या गणातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसकडून विठ्ठल गोळे यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून आणि कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. “आपला हक्काचा, काम करणारा माणूस” अशी ओळख असलेले विठ्ठल गोळे सध्या लोकाग्रहाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्व पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे विश्वासू आणि निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले विठ्ठल गोळे हे राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस असून, गेल्या वीस वर्षांपासून ते सातत्याने समाजकार्यात सक्रिय आहेत. गोरगरिबांचे प्रश्न, कामगारांचे हक्क, संघटनेच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या कामगार कुटुंबियांना मदतीचा हात – अशा असंख्य कामांतून त्यांनी स्वतःला एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष कार्यकर्ता म्हणून सिद्ध केले आहे.
विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांत त्यांना राजकारणात संधी चालून आली होती. मात्र सत्तेचा मोह न धरता त्यांनी प्रत्येक वेळी “राजकारणापेक्षा समाजकार्य महत्त्वाचे” अशी भूमिका घेत संधी नाकारली. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असून, खुद्द जनताच त्यांना पुढे येण्याची विनंती करत आहे. “आता काम करणारा माणूस सत्तेत हवा” अशी भावना खर्शी–बारामुरे गणात सर्वत्र व्यक्त होत आहे.
खर्शी–बारामुरे गावचेच रहिवाशी असलेल्या गोळेंनी या संपूर्ण गणातील प्रत्येक गावाशी, प
आपली नाळ घट्ट जोडलेली आहे. त्यामुळेच २०२५ च्या लोकसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे साहेबांना आपल्या गणातून मताधिक्य दिले आहे. साहेबांचा विश्वासू योद्धा म्हणून गोळे त्यांच्या वीस वर्षांच्या निःस्वार्थ कार्याचीच ही पोचपावती असल्याचे बोलले जात आहे.
करहर पंचक्रोशीतील नागरिक, विविध सामाजिक, शैक्षणिक, संस्था तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते यांच्याकडून विठ्ठल गोळे यांना उमेदवारी देण्याचा आग्रह वाढत आहे. “आपला हक्काचा माणूस, समाजकार्याचा वसा घेतलेला नेता” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, पंचायत समिती निवडणुकीत खर्शी–बारामुरे गणातून विठ्ठल गोळे यांचे नाव सर्वसामान्यांच्या मनातून पुढे येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
: खर्शी – बारामुरे गणाने जावळी पंचायत समितीमध्ये अनेक दिग्गजांनी प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे. हा पंचायत समिती गण प्रतिष्ठेचा समजला जातो. येथून अनेकांनी जावळी तालुक्याचे प्रतिनिधित्व केलं आहे. हा गण नेहेमीच वलयांकित राहिला आहे. या गणला विशेष महत्व प्राप्त झालं आहे.

