वाळंजवाडी येथे स्वच्छता हीच सेवा अंतर्गत ग्राम स्वच्छता मोहीम..वृद्धांपासून ते युवकांपर्यंत सर्वांची हाती झाडू…!

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : २ ऑक्टोबर रोजी देशभरात महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय अभियानांतर्गत विविध स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. स्वच्छ भारत निर्माण करण्याच्या संकल्पाला बळ दिले. याच अनुषंगाने वाळंजवाडी, तालुका – जावळी गावाने श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी वृद्धांपासून ते युवकांपर्यंत सर्वांची हाती झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली..

 

वाळंजवाडी, तालुका जावळी २ ऑक्टोबर २०२५ रोजी या गावामधे श्रमदान घेण्यात आले .श्रमदान हेच श्रेष्ठ ही शिकवण गावकऱ्यांना या उपक्रमातून मिळाली.महात्मा गांधी यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.स्वच्छता असेल दारोदारी आरोग्य तिथे वास करी.या उक्तीप्रमाणे गावातील परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणूनच हा परिसर स्वच्छ करण्यासाठी राबवलेला छोटासा उपक्रम होता

वाळंजवाडी गावचे सरपंच ,उपसरपंच, सदस्य कमिटी व गावकरी मंडळी या सर्वांचा सहभाग या श्रमदान करण्यात मिळाला. स्वच्छ ठेवा परिसर, आरोग्य राहील सुंदर हा छोटासा संदेश या गावाने प्रत्येकाला दिलेला आहे.

सोबत फोटो :
वाळुंजवाडी, : येथे स्वच्छता हीच सेवा अंतर्गत श्रमदानातून गाव स्वच्छ करताना ग्रामस्थ

error: Content is protected !!