पसरणी घाटातील दत्त मंदिराजवळील खड्डा देतोय अपघातांना निमंत्रण; खड्डा भरण्याचे वाहनधारकांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला साकडे,

Spread the love

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सुरुर- पोलादपूर मार्गावर पाचगणी – वाई या मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात दत्त मंदिराजवळ मध्य रस्त्यात पडलेला खड्डा वाहनधारकांना जीवघेणा ठरत असून अपघातांना निमंत्रण देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कानाडोळा वृत्तीला मात्र वाहनचालकांकडून खड्डा भरण्याचे साकडे घातले जातेय.

पाचगणी – वाई दरम्यान पसरणी घाटात दत्त मंदिरासमोर मुख्य रस्त्यावर मध्यभागी खड्डा पडला आहे. दिवसा हा निदर्शनास येतो. मात्र रात्रीच्या वेळी हा खड्डा दिसत नाही. अशा वेळी अपघात घडण्याची शक्यता आहे. असे असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे वाहतूक वर्दळ वाढत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन डागडुजी करीत खड्डा भरावा. असे साकडे वाहनधारकांतून घातले जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!