रोजगारक्षम कोर्समधून उद्याचे नवे तंत्रज्ञ घडतील;  अमर बिरामने. पाचगणी आय टी आय मध्ये अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू..

Spread the love

 गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी :  युवकांमध्ये उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि व्यवसाय व्यवस्थापन कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. याच माध्यमातून महाराष्ट्र शासनाने अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू केला आहे. हे कोर्स पाचगणी ITI मध्ये उपलब्ध झाले आहेत. यामधून उद्याचे नवे तंत्रज्ञ घडतील. याकरिता जावळी – महाबळेश्वर तालुक्यातील युवकांनी नवीन कोर्सेसचा   लाभ घ्यावा. असे आवाहन ऍस्टन हॉस्टलचे संचालक अमर बिरामणे यांनी केले.

कौशल्य रोजगार, उपभोगता, व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण, व प्रशिक्षण, संचनालय महाराष्ट्र राज्य,  संचालित छत्रपती प्रतापसिंह महाराज, शासकीय प्रशिक्षण संस्था महाबळेश्वर, ( पाचगणी) येथे अल्पकालीन रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमांना मुख्य अतिथी  विश्वकर्मा (लाभार्थी,) संतोष मोहिते,कार्यक्रमाचे अध्यक्ष गोडवलीचे सरपंच विष्णु मालुसरे, मुख्य अतिथी ऍस्टन हॉस्टेलचे संचालक अमर बिरामणे, सुनील बगाडे, सुरेश साळुंखे, प्रमोद पवार,  वर्णे सर, हनुमंत मालुसरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथमतः मान्यवर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून मुख्यमंत्री अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ चा फित कापून शुभारंभ करण्यात आला यामध्ये सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल मित्रा,
सर्टिफिकेट कोर्स इन फोर व्हीलर सर्विस असिस्टंट, सर्टिफिकेट कोर्स इन फिटर फॅब्रिकेशन, सर्टिफिकेट कोर्स इन हेल्पर इलेक्ट्रिशियन कोर्स सूर करण्यात आले आहेत.

प्रस्ताविकामध्ये बोलताना प्रमोद पवार यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय भिमुख शिक्षणाला प्राधान्य द्यावे. तर रोजगारक्षम कोर्स किती महत्वपूर्ण आहेत कोर्स संदर्भात मार्गदर्शन केले.

  यावेळी आयटीआय संस्थेचे  प्राचार्य,उपाध्ये एम. के, प्र. प्राचार्य भोसले पी. एम, घोगले एम.एस, भिंताडे एस.एन, बोंबले पी. डी, फुटाणे पी. एस, कांबळे बी. आर, श्रीमती नानेगावकर, श्रीमती मेघा मोहिते, वांद्रे एस. ए, निकम सर, शिंदे निखील, शिंदे सिद्धार्थ, कांबळे सिद्धार्थ, बडेकर, उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मेघा मोहिते मॅडम यांनी केले तर आभार भोसले पी एम यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!