भिलार गणात ‘तेजस्विनी’ लाट; पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारीसाठी पंचक्रोशीतून जोरदार मागणी..
गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला असून, तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भिलार गणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा हा गण ‘सर्वसाधारण महिला’ गटासाठी आरक्षित झाल्याने येथून कोण उमेदवार असेल, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

अशातच, कै. बाळासाहेब भिलारे यांच्या सुष्णा तेजस्विनी भिलारे यांचे नाव सध्या पंचक्रोशीत जोरदार चर्चेत असून, त्यांना उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी भिलारसह परिसरातील अनेक गावांतून पुढे येत आहे.
📈 लोकप्रियतेचा वाढता आलेख
भिलार हे केवळ ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही संवेदनशील आणि महत्त्वाचे केंद्र मानले जाते. गेल्या काही वर्षांत तेजस्विनी भिलारे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात घेतलेला पुढाकार, युवकांमधील त्यांचा प्रभाव आणि सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद यामुळे त्या आज भिलार गणातील एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह चेहरा ठरल्या आहेत. आरक्षण जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियासह प्रत्यक्ष भेटीगाठींतून त्यांच्या नावाचा जोरदार प्रचार सुरू केला आहे.
🤝 पंचक्रोशीतील गावांचा भक्कम पाठिंबा
भिलारसह गणांतर्गत येणाऱ्या इतर गावांमधूनही तेजस्विनी भिलारे यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे. “एक सुशिक्षित, अभ्यासू आणि लोकांमध्ये मिसळून काम करणारे नेतृत्व पंचायत समितीत गेले, तर भिलार गणाचा चेहरामोहरा बदलेल,” अशी भावना अनेक ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
तेजस्विनी भिलारे या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे घराघरात पोहोचल्या आहेत. त्या चालवत असलेल्या शैक्षणिक संस्थांमधून आजपर्यंत सुमारे ३००० विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले असून, हा मोठा जनसंपर्क त्यांचा मजबूत पाया मानला जात आहे. यासोबतच प्रशासकीय समज, सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कौशल्य, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी रोजगार व क्रीडा क्षेत्रातील संधी निर्माण करण्यासाठी असलेली तळमळ — या सर्व गुणांमुळे त्या एक परिपक्व आणि सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.
🏛️ दिग्गज इच्छुकांपुढे आव्हान
भिलार गण खुल्या महिला गटासाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गज इच्छुकांनी तयारी सुरू केली असली, तरी तेजस्विनी भिलारे यांच्या नावाची वाढती लाट पाहता प्रस्थापित नेत्यांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्रामस्थांच्या या ‘आरडाओरड्याची’ दखल आता वरिष्ठ नेत्यांना घ्यावी लागणार, हे निश्चित मानले जात आहे.
तेजस्विनी भिलारे यांना उमेदवारी मिळाल्यास, कै. बाळासाहेब भिलारे यांनी तालुक्यासाठी केलेल्या कार्याची आठवण ठेवून सर्वपक्षीय एकत्र येत बिनविरोध निवड देण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तसे झाल्यास, ती कै. बाळासाहेब भिलारे यांना एक आगळीवेगळी आदरांजली ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
🗣️ प्रतिक्रिया
“भिलार गणाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांमध्ये राहून काम करणारे नेतृत्व हवे. तेजस्विनी भिलारे या सक्षम उमेदवार असून त्यांना संधी मिळणे ही काळाची गरज आहे.”
— विश्वनाथ भिलारे, ग्रामस्थ“जिल्हा परिषद व पंचायत समिती इच्छुक उमेदवारांची माहिती मकरंद आबांपर्यंत पोहोचवू. ते जो निर्णय घेतील, त्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू.”
— राजेंद्र शेठ राजपुरे“मकरंद आबा सांगतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी आमची. कै. बाळासाहेब भिलारे यांचे ‘सहा – शून्य’ चे स्वप्न पूर्ण करून त्यांना श्रद्धांजली वाहू.”
— नितीन दादा भिलारे“माननीय मकरंद आबांनी संधी दिली, तर त्या संधीचे सोने करून दाखवीन.”
— तेजस्विनी भिलारे..

