पाचगणी नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; १३० निवडणूक कर्मचाऱ्याची नियुक्ती तर सुरक्षेसाठी १२६ जणांचा फौजफाटा तैनात..
गिरिस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेच्या आज निवडणूक होत असून १० प्रभागातून २०+१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहेत. त्याकरिता निवडणूक प्रशासनाने आज १३ मतदान केंद्रावर १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना निवडणूक साहित्याचे वाटप केले तर पोलिस प्रशासनाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता १२६ जणांचा फौजफाटा तैनात केला आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

पाचगणी नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीने होत आहे. १० प्रभागातून २० नगरसेवक व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. २१ जागांसाठी निवडणूक होत आहे..
यासाठी निवडणूक प्रशासनाने १३ मतदान केंद्राद्वारे मतदान प्रक्रिया पार पडले. याकरिता निवडणूक प्रशासनाने १३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पोलिस प्रशासनाने १२६ जणांचा फौजफाटा पुरविला आहे. यामध्ये ५२ होमगार्ड, ७० पोलिस कर्मचारी, ४ अधिकारी असा एकूण १२६ जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त फोर्सची नियुक्ती, प्रभागांमध्ये वाढीव गस्त, नाकाबंदी, काटेकोर तपासणी, टेबललॅन्ड नाका, संजीवन नाका, टोलनाका, आदी महत्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त उभारला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची व नागरिकांची काटेकोर ओळख तपासणी सकाळपासून ते रात्रीपर्यंत गस्त पथके गस्त घालीत आहेत..
चौकट : प्रभागनिहाय मतदान केंद्र,
१) प्रभाग क्रमांक १ मतदान केंद्र क्र १ डॉ. बिलीमोरया हायस्कूल, कंप्युटर रूम अनुक्रमांक १ ते ५०४, ( ५०४)
२)प्रभाग क्र २ मतदान केंद्र क्र १ शासकीय तांत्रिक विद्यालय ( पश्चिमेकडील खोली ) अनुक्रमांक १ ते ९३३, (९३३)
३) प्रभाग क्रमांक ३ केंद्र क्रमांक २ न.पा. मुलींची शाळा क्र. २ (पश्चिमेकडील खोली), अनुक्रमांक १ ते ६३२, (६३२)
४)केंद्र क्रमांक १, न.पा. मुलींची शाळा क्र. २, (पूर्वेकडील खोली )अनुक्रमांक ६३३ ते १२५० (६१८)
५)प्रभाग क्रमांक ४ केंद्र क्रमांक १ न्यू इरा हायस्कूल, ( ८ वी क ची वर्ग खोली,) अनुक्रमांक १ ते ४८५ ( ४८५)
६)प्रभाग क्रमांक ५ केंद्र क्रमांक १ न.पा. मुलांची शाळा १ ( ८ वी च्या वर्गाची खोली) अनुक्रमांक १ ते ८४० (८४०)
७)केंद्र क्रमांक २ न.पा. मुलांची शाळा ( इ. ६ वी वर्ग खोली,) अनुक्रम ८४१ ते १७५१ (९११)
८)प्रभाग क्रमांक ६ केंद्र क्रमांक १ किमिस हायस्कूल, (८ वी वर्ग खोली,) अनुक्रमांक १ ते १००७ (१००७)
९)प्रभाग क्रमांक ७ केंद्र क्रमांक १
संजीवन विद्यालय,( ६ वी वर्ग खोली,) १ ते ६४६ (६४६)
१०)प्रभाग क्रमांक ८ केंद्र क्रमांक १ हैप्पी हवर्स स्कूल ( ९ वी वर्ग खोली) अनुक्रमांक १ते११० (मतदार संख्या ९१०)
११)प्रभाग क्रमांक ९ केंद्र क्रमांक १
सेंट हायस्कूल, शाहूनगर
( ५ वी वर्ग खोली) अनुक्रमांक १ ते ८७० ( ८७०)
१२) केंद्र क्रमांक २ सेंट झेविअर्स हायस्कूल, ( १० वी वर्ग खोली) अनुक्रमांक ८७१ से १७५६, (८८६)
१३) प्रभाग क्रमांक १० केंद्र क्रमांक १ श्रीमती मिनलबेन मेहता( दक्षिण इमारतीमधील उत्तराभिमुख)अनुक्रमांक १ ते ९५९ ( ९५९)

