प्रभाग २ मध्ये राजकीय समीकरणांचा ताळमेळ बदलत — नरेंद्र दादा पुन्हा एकदा विकासाच्या मैदानात आघाडीवर!

गिरीस्थान टाईम्स वृत्तसेवा पाचगणी: पाचगणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग २ मध्ये नरेंद्र बिरामणे (नारायण दादा ) यांच्या बाजूने जोरदार कल पाहायला मिळत आहे. गेल्या कार्यकाळातील विकासकामांची भक्कम नोंद, नागरिकांशी कायम साधलेला संवाद आणि जमिनीवरचे नेतृत्व यामुळे राजकीय समीकरणांचा ताळमेळ बदलत — नरेंद्र दादा पुन्हा एकदा विकासाच्या मैदानात आघाडीवर!

स्थानिक समस्या ओळखून त्यावर केलेले समाधानकारक प्रयत्न, रस्ते–पाणी–स्वच्छता अशा मूलभूत सुविधांमध्ये केलेल्या सुधारणा आणि प्रभागातील सर्वसामान्यांचा विश्वास हेच बिरामणे यांच्या प्रचाराचे मुख्य बळ ठरत आहे.
“विकास हाच ध्यास” या भूमिकेतून नरेंद्र दादा पुन्हा एकदा नेतृत्व करण्यास तयार असून, मतदारांमध्येही त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण असल्याचे जाणवत आहे.
प्रभागात ‘नवा ध्यास, नवी पहाट’ — नरेंद्र बिरामणेचीच जोरदार लाट!
पाचगणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २ मध्ये नरेंद्र बिरामणे यांच्या नेतृत्वाची लाट आणखी प्रबळ होताना दिसत आहे. “नवा ध्यास, नवी पहाट” या घोषणेनिशी विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याची जनतेतून जोरदार मागणी व्यक्त होत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक विकासकामांतील सातत्य, संवादशील शैली आणि लोकाभिमुख कार्यपद्धती यामुळे बिरामणे यांच्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रभागातील तरुण मतदारांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक घटकांनी त्यांना मिळणारा पाठिंबा वाढताना दिसतो.

